रावेर

कोचुर बुद्रुक येथे केळी व्यावसायिक तरूणाची राहत्या घरात आत्महत्या

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

सावदा (प्रतिनिधी)। येथून जवळच असलेल्या कोचूर बुद्रुक येथील रहिवासी असलेल्या ३५ वर्षिय केळी चे किरकोळ व्यावसायिकाने राहत्या पत्राचे घरात आळ्याला दोरी च्या सहाय्यानें गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल सायंकाळी उघडकीस आली.

कोचूर बुद्रुक तसेच परिसरातील अनेक गावांमध्ये किरकोळ केळी, कमिशन बेसेसवर व्यवसाय करीत असलेले कोचूर बुद्रुक येथील महेंद्र नामदेव महाजन वय वर्षे ३५ यांनी काल राहत्या पत्राचे घरातील आळ्याला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत सावदा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सायंकाळी शवविच्छेदनानंतर त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. आत्महत्याचे ठोस कारण समजू शकले नसून, पुढिल तपास सपोनि इंगोले यांचे मार्गदर्शना खाली पोलीस कर्मचारी करीत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!