भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यरावेर

रावेर तालुक्यातील प्रा. आ. केंद्र – निंभोरा बु. अंतर्गत उपकेंद्र – बलवाडी च्या वतीने ‘ जागतिक हिवताप दिन’ साजरा

बलवाड़ी, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज. आशीष चौधरी |रावेर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य उप केंद्र बलवाडी येथे जागतिक हिवताप दिन साजरा करण्यात आला.

२५ एप्रिल रोजी रावेर तालुक्यातील बलवाड़ी ग़ावात प्रा. आ. केंद्र – निंभोरा बु. ता – रावेर अंतर्गत उपकेंद्र – बलवाडी च्या वतीने बलवाडी गावात डॉ. अमोल भंगाळे. तालुका आरोग्य अधिकारी, रावेर. श्री. विजय नेमाडे. तालुका पर्यवेक्षक, रावेर. यांच्या  मार्गदर्शनाखाली प्रा. आ. केंद्र – निंभोरा. चे मा. डॉ अजय रिंध्ये. ( वैद्यकीय अधिकारी ) डॉ. निरज पाटील.( वैद्यकीय अधिकारी ) डॉ.महेंद्र अजलसोंडे यांच्या आदेशानुसार श्री. आर. के. पाटील.( प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी ),तसेच आरोग्य सेवक श्री.हिरालाल तायडे, श्री. अजय साळुंखे. श्री. विशाल भोई., किरण बढे. तनवीर तडवी, अजित राणे.या टीमने गावात मोक्याच्या ठिकाणी जाऊन नागरिकांना हिवताप आजाराबाबत आरोग्यशिक्षण (गटारी वाहत्या करणे, संडाशीच्या व्हेंट पाईपला जाळी लावणे, आठवड्यात एक दिवस कोरडा दिवस पाळणे ई.) हस्तपत्रिका वाटप करून व कॉर्नर सभा घेऊन मोठया प्रमाणात जनजागृती केली.व जागतिक हिवताप दिन साजरा करण्यात आला.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!