वाढदिवस ठरला अखेरचा दिवस, पाल येथे जळगावच्या दोन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
रावेर,मंडे टू मंडे वृत्तसेवा। पाल येथे दोन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली असून दोघ तरुण जळगाव येथील वाघ नगरातील एक तरुण व खेडी येथील एक तरुण असल्याची माहिती मिळतेय. दरम्यान, पाण्यात बुडालेल्या तरुणांचा रात्री उशीरापर्यंत शोध सुरू होता.
मिळालेल्या माहिती नुसार अक्षय उर्फ उज्ज्वल राजू पाटील वय २४, रा. खेडी (जळगाव) या तरूणाचा वाढदिवस असल्याने त्याचे सर्व मित्र हे रावेर तालुक्यातील निसर्गरम्य पाल येथे गेले होते. दरम्यान, सायंकाळच्या सुमारास हे तरूण पाण्यात पोहण्यासाठी उतरले. यात उज्ज्वल पाटील आणि त्याचा एक मित्र हे पाण्यात बुडाले. यामुळे भेदरलेल्या त्याच्या मित्रांनी तातडीने ही माहिती घरच्यांना दिली. यानंतर पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच या तरूणांच्या नातेवाईकांनी देखील घटनास्थळी धाव घेतली असून त्यांचा शोध सुरू केला. रात्री उशीरापर्यंत या दोन्ही तरूणांचा शोध घेण्यात आला असता ते अद्द्याप मिळून आले नाहीत.