ऐनपुर येथील ख़िर्डी रोड वरील ‘त्या’ गटारिंचा झाला अखेर श्वास मोकळा; मंडे टू मंडे वृत्ताचा दणका
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
ऐनपुर,ता.रावेर (इकबाल पिंजारी): “ऐनपुर येथील ख़िर्डी रोड वरील गटारिंचा झाला दमकोंडा” या आशयाची बातमी ‘ मंडे टू मंडे’ ने प्रकाशित केली होती, त्याची दखल घेत प्रशासनाने ऐनपुर बस स्टॉप जवळून जवळच असलेल्या पुनर्वसन प्लाटला लागुनच ख़िर्डी रोड वरील गटारिंचा श्वास मोकळा केला आहे अर्थात संबंधित विभागाकड़ून त्या गटारींची साफसफाई करण्यात आली आहे, हे खरे परंतु गटारीमधील घाण,गाळ तसेच कचरा गटारिंच्या बाजुलाच काढण्यात आला आहे तरी त्या घाणयुक्त कचऱ्याची विल्हेवाट ही लावणे हेही आरोग्याच्या दृष्टीने तितकेच महत्वाचे आहे सदर घाणयुक्त कचऱ्याची विल्हेवाट लवकरात लवकर लावण्यात येईल अशी अपेक्षा नागरिकांकडून होत आहे
बऱ्याच महिन्यांपासुन या गटारींकड़े संबंधित विभागाने दुर्लक्ष केले होते, तसेच बरीचशी घाण त्या गटारित अडकलेली होती त्यामुळे सर्व दूर दुर्गंध पसरत होता अश्या घाण व दुर्गंधिमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची दाट शक्यता होती परन्तु संबंधित विभागाकड़ूंन उशिरा का होईना त्या गटारिंची साफसफाई केली आहे, परंतु गटारीमधुन काढण्यात आलेला घाणयुक्त कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे ही तितकेच महत्वाचे आहे कारण;जवळच रहिवास असलेल्या नागरिकांच्या तसेच त्या रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या आरोग्यासही धोका निर्माण व्हायला नको अशी अपेक्षा संबंधित विभागाशी नागरिकांची आहे.