रावेर येथे वात्साल्य ब्युटी पार्लर संस्थेकडून प्रशिक्षणाच्या नावाखाली ४१ मुलींची फसवणूक
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
रावेर, मंडे टू मंडे वृत्तसेवा। रावेर पंचायत समिती समाज कल्याण विभागा मार्फत ब्यूटी पार्लर प्रशिक्षण देण्याच्या नावाखाली रावेर येथील वात्साल्य ब्युटी पार्लर संस्थेने तालुक्यातील सावखेडा येथील ४१ विद्यार्थीनीची प्रशिक्षणापोटी आर्थिक फसवणुक केल्याची धक्कादायक घटना घडली असून या बाबत आर्थिक फसवूणक झालेल्या मुलींनी रावेर पंचायत समितीकडे तक्रार केली आहे.
पंचायत समिती समाज कल्याण विभागा मार्फत गरीब व आर्थिक दृष्ट्या मागास मुलींना स्वता:च्या पायावर उभे राहण्यासाठी विनामूल्य ब्यूटीपार्लरचे प्रशिक्षण तसेच ब्यूटीपार्लरचे साहित्य पुरवले जाते. या प्रशिक्षणात ब्युटी पार्लरचे साहित्य देखिल विनामूल्य दिले जाते,परंतु रावेरच्या वात्साल्य ब्युटी पार्लर संस्थेने प्रशिक्षण देण्याच्या नावाखाली या सर्व ४१ मुलींची आर्थिक फसवणुक करून अटी-शर्तीचा भंग केल्याची धक्कादायक घटना घडली असून संस्थेने प्रत्येक गरीब मुलीं कडून, प्रशिक्षण व प्रशिक्षणाचे साहित्य विनामूल्य असताना प्रत्येकी ४०० रुपये प्रमाणे फि व फार्म भरण्याचे १० रुपये अशी एकूण ४१० रुपये प्रमाणे ४१ मुलींकडून १६ हजार ८१० रूपये जास्तची फी गोळा करून वरकमाई केली आहे.त्याच प्रमाणे प्रशिक्षणपोटी देलेले ब्युटी पार्लरचे साहित्य देखिल मुदत संपलेल दिल्याने अनेक मुलींचे चेहरे खराब झाल्याची तक्रार पंचायत समितीत कडे फसगत झालेल्या मुलींनी केली असून फसवणूक केलेल्या ब्युटी पार्लरवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मुलींनी केली आहे, रावेर पंचायत समिती यावर काय कारवाई करते या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.