रावेर विधानसभा मतदार संघात पंचरंगी लढत, नऊ उमेदवार रिंगणात
रावेर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l आज माघारीच्या दिवशी रावेर विधानसभा मतदार संघाच्या निवडणूकीसाठी २३ उमेदवारांपैकी १४ जणांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतले असून आता निवडणूकीच्या रिंगणात ९ उमेदवार असून खरी लढत ही पंचरंगी होणार असून भाजपा, काँग्रेस, प्रहार जनशक्ती, वंचित बहुजन आघाडी व अपक्ष यांच्यात खरी लढत होणार असल्याचे चित्र आज स्पष्ट झाले आहे.
आज रावेर विधानसभा निवडणूकीत शेवटच्या दिवशी २३ उमेदवारांपैकी १४ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले असुन आता एकूण ९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यात अमोल हरीभाऊ जावळे ,(भाजपा, महायुती), धनंजय शिरीष चौधरी, (काँग्रेस). नारायण हिरामण अडकमोल, (बसपा). अनील छबिलदास चौधरी,( प्रहार जनशक्ति पार्टी), आरिफ खालिक शेख,(ऑल इंडिया मजलिस पार्टी). खल्लोबाई युनूस तडवी (ऑल इंडिया हिंदुस्तान काँग्रेस पार्टी) मुस्ताक कमाल मुल्ला (आजाद समाज पार्टी), शमिभा भानुदास पाटील (वंचित बहुजन आघाडी), दारा मोहंमद जफर मोहंमद (अपक्ष) असे ९ उमेदवार रिंगणात आहे.
आज शेवटच्या दिवशी यांनी घेतली माघार
सुरेश गुलाब बोदडे, उमा विठ्ठल भिल, संजय अर्जुन चौधरी, नुरा तडवी, धीरज अनिल चौधरी, नंदिनी अनिल चौधरी, अबाज फकिरा तडवी, वामनराव भालचंद्र जडे, गंगाराम महेंद्र बान्हे, दिवाकर वाणी, शोहिखान मुस्तफा तडवी, शेख कुर्बान शेख करीम, संजय हमीद तडवी, हर्षा अनिल चौधरी यांनी आज शेवटच्या दिवशी माघार घेतली आहे.