भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरसामाजिक

खिर्डी येथे दारिद्र्य रेषेच्या कार्ड पासून ग्रामस्थ वंचित…

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

खिर्डी ता.रावेर(प्रतिनिधी): खिर्डी येथे सन 2003 मध्ये सर्व्हे झालेला असून खरोखरच ज्या लोकांना याची नितांत आवश्यकता आहे अशा गोर गरीब लोकांना जास्तीचे गुण देवून एक प्रकारे छळ करण्यात आला तसेच ग्राम पंचायत प्रशासनाच्या चुकीच्या निर्णयामुळे गावातील अनेक गोर गरीब कुटुंबांना डावलण्यात आले.

तहसीलदार यांनी 23 लाभ धारकांची यादी मंजूर केलेली असून ती दारिद्र्य रेषेच्या यादीत समाविष्ट करण्यात यावी या बाबतचे आदेश दिलेले असून सुध्दा मनमानी कारभार करणाऱ्या ग्राम पंचायत प्रशासनाने जाणून बुजून दुर्लक्ष करीत कार्ड वाटप करण्यात दिरंगाई केली जात आहे. तसेच गावातील गोर गरीब लोकांना दारिद्र्य रेषेचे कार्ड न मिळाल्याने पात्र असून सुध्दा घरकुल योजनेचा लाभ घेता येत नसल्याने शासनाच्या विविध योजनांपासून वंचित राहिले आहेत.तसेच मुले हि शैक्षिणक सवलती पासून वंचित असून दारिद्र्य रेषेच्या पिवळ्या कार्ड शिवाय कुठलाही पर्यायी मार्ग शोधता येत नाही या बाबत विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तर देत असतात गावातील नागरिकांना अरेरावीची भाषा वापरून अपमानास्पद वागणूक मिळत असते. तहसीलदार यांनी दिलेल्या आदेशाची ग्रामपंचायत प्रशासनाकडून पायमल्ली होत असल्याचे दिसत आहे या सर्व प्रकरणाची वरिष्ठ अधिकारी यांनी चौकशी करून योग्य ती कारवाई करावी व न्याय मिळवून द्यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केलेली असून न्याय न मिळाल्यास लोकशाही मार्गाने लढा दिला जाईल असेही ग्रामस्थांकडून सांगण्यात आले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!