भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरसामाजिक

भटकंती करणाऱ्या रावेर शहरातील मुलांना बाल कल्याण समितीत दाखल, प्रणित महाजन व सहकाऱ्यांचा स्तुत्य उपक्रम

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

रावेर,मंडे टू मंडे,प्रतिनिधी। सुमारे ८ ते १० दिवसांपासून आम्हाला रावेर शहरात छोरिया मार्केट तसेच आजूबाजूच्या परिसरात दोन मुले व दोन मुली हे गावांत दिवसभर भिक मांगूत फिरतांना दिसतात. तसेच रात्री महालक्ष्मी मंदिर परिसरात झोपतात. म्हणून प्रणित महाजन व त्यांचे सहकारी मित्र अशा गावांत भटकणाऱ्या लहान मुलांना भेटून त्यांचे नाव व गाव विचारता त्यांची नावे (१) अनिल रामसिंग पावरा अंदाजे वय ७ वर्षे, (२) राधा रामसिंग पावरा अंदाजे वय ६ वर्षे, (३) भारती रामसिंग पावरा अंदाजे वय ४ वर्षे, (४) विक्रम रामसिंग पावरा अंदाजे वय ३ वर्षे हल्ली राहणार जुना सरकारी दवाखान्याच्या मागे, रावेर असे सांगितले.

सदर ठिकाणी जाऊन त्यांचे आई- वडिलांचा तपास केला असता त्यांचे वडील रामसिंग पावरा व आई हे दारूच्या नशेत होते ते नेहमी दारू सेवन करीत असतांना त्यांची मुले त्यांच्या मारहाणीच्या धाकाने गावात भिक मागत फिरतात व आईवडिलांना घाबरतात. सदरचे मुले ३ दिवसापासून आमच्याकडे राहत आहेत. सदर मुलांनी भिक मांगतांना ते वाम मार्गाने लागू नये त्यांचे भविष्य उज्वल व्हावे. या मुलांना त्यांचे आई- वडील सांभाळ करायला तयार नसल्याचे दिसून येत असल्याने तसेच ही मुले रात्री- बेरात्री भटकतात तरी या चारही लहान मुलांना बाल कल्याण समिती जळगांव येथे दाखल करण्यात यावे. याबाबत चा अर्ज रावेर पोलीस निरीक्षक मा. कैलास नागरे यांना रावेर शहरातील युवक नेतृत्व प्रणित महाजन व त्यांचे सहकारी दिपक जाधव, प्रफुल महाजन, सचिन पाटील, सागर जगताप, तुषार महाजन, महेश चौधरी, लहू जाधव, गोलू मराठे, विक्रांत मराठे, शुभम मराठे, गोपाल पाटील, योगेश पवार, योगेश महाजन, जयेश महाजन, दुर्गेश मोपारी, राजेश महाजन, श्रीकांत जगताप, गोविंद मराठे, कपिल बिरपन, आदर्श मंगवानी यांनी आपले जवाब व स्वाक्षऱ्यासह दिला.
यानुसार सर्व कायदेशीर प्रक्रिया करून सदरच्या बालकांना बाल कल्याण समिती जळगांव येथे आजच रवाना करण्यात आले आहे. याप्रसंगी या लहान मुलांना नविन ड्रेस व केक कापून निरोप देत असतांना सर्वांना अश्रू अनावर झालेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!