ऐनपुर व विरोदा ग्राम पंचायत कार्यालयात संविधान दिवस साजरा
ऐनपुर/विरोदा,मंडे टू मंडे न्यूज प्रतीनिधी । रावेर तालुक्यातील ऐनपुर व यावल तालुक्यातील विरोदा येथे ग्राम पंचायत कार्यालयात संविधान दिवस साजरा करण्यात आला.आज देशभरात मोठ्या उत्साहात संविधान दिवस साजरा करण्यात आला, २६ नोव्हेंबर १९४९ आणी २६ जानेवारी १९५० भारताच्या इतिहासातिल महत्वाचे दोन दिवस २६ नोव्हेंबर १९४९ रोजी घटना समितीने भारतीय राज्यघटनेचा स्वीकार केला तर २६ जानेवारी १९५० रोजी तिची अंमलबजावणी करण्यात आली त्यानंतर भारत एक प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून अस्तित्वात आलं त्यामुळे या दिवसाच महत्व लक्षात घेऊन २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणुन साजरा करण्यात येतो भारतीय राज्यघटना हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे . समता बंधुता स्वातंत्र्य आणि न्याय या . मुल्यांची राज्यघटनेत बिजे रोवुन भारताच्या संविधानाची निर्मिती करण्यात आली.त्यामुळे हा दिवस संपुर्ण भारत संविधान दिवस मोठ्या उत्सवात साजरा करण्यात येतो.
ऐनपूर,ता. रावेर
आज ऐनपुर ग्राम पंचायत मध्ये संविधान दिवस साजरा करण्यात आला संविधान प्रस्तावनेचे वाचेन घोलाणे सर यानी केले व डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला ग्राम पंचायत सदस्य किशोर पाटील यानी पुष्पहार अर्पण केले तसेत सदस्य अनिल कोळी श्री फळ फोडले या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका सरचिटणस अरविंद महाजन यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्या प्रमाणे पुढील कार्यकर्ते विलास अवसरमल राहूल महाजन विजय अवसरमल पुथ्वीराज कोळी निलेश कोळी अरविंद महाजन रविद्र महाजन मोहन कचरे सचिन कोळी सलमान खान हैदर अली जितु महाजन विनायक पाटील तसेच मोठ्या संख्येने गावातील नागरीक उपस्थित होते .
विरोदा,ता. यावल
आज दिनांक 26 नोव्हेंबर 2022 रोजी विरोदा ग्रामपंचायत तालुका यावल जिल्हा जळगाव येथे संविधान दिनानिमित्त संविधान वाचन व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन व सामूहिक संविधान वाचन करण्यात आले विरोधा गावाचे ग्रामसेवक शिवाजी सोनवणे, सरपंच जीवन तायडे, तुषार तायडे, सागर तायडे ,चेतन तायडे ,संदीप तायडे ,अमोल वारके इत्यादी उपस्थित होते