ब्रेकिंग : यावल पंचायत समिती गटविकास अधिकारी चौधरी गाडीचा भीषण अपघातात ठार
यावल,मंडे टू मंडे न्युज । यावल पंचायत समितीचे प्रभारी तर अमळनेर गटविकास अधिकारी एकनाथ चौधरी यांच्या गाडीचा आज पहाटे भीषण अपघात झाला असून त्यात ते जागीच ठार झाले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, अमळनेरचे गटविकास अधिकारी तथा यावल पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी एकनाथ चौधरी हे आज दिनांक 23 नोव्हेंबर 22 रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास यावल येथून नाशिक येथे एमएच 19 डीव्ही 4199 या गाडीने शासकीय कामासाठी जात असताना अमळनेर तालुक्यातील बोहरा फाटा जवळ पावणे सहा वाजेच्या सुमारास गाडीचा आणि ट्रकचा अपघात होऊन जागीच मृत्यु झाला तर ड्रायव्हर ला किरकोळ दुखापत झाली आहे.
गाडीने उभ्या ट्रकला मागून ठोस दिल्याने एकनाथ चौधरी हे क्लीनर साईडला बसलेले होते त्या ठिकाणी गाडी ट्रकवर आढळल्याने ते जागीच मृत्यूव पावले. एकनाथ चौधरी यांच्याकडे अमळनेर पंचायत समितीच्या कार्यभार सांभाळून यावल पंचायत समितीच्या प्रभारी कार्यभार सांभाळीत होते. शेवटचे वृत्त हाती आले तोपर्यंत या घटनेची पोलीसात नोंद घेण्याचे काम सुरू होते. त्यांच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.