सावदा-फैजपूर सह रावेर यावल तालुक्यात पावसाचा हाहाकार, हातनूर धरणाचे ४१ दरवाजे उघडले
मंडे टू मंडे न्युज चमू कडून : आज दि.१९ बुधवार रोजी सकाळपासूनच दिवसभर पावसाने ठिकठिकाणी रौद्ररूप धारण केले. सावदा -फैजपूर सह रावेर,यावल तालुक्यात मोठया प्रमाणावर पाऊस पडल्याने नद्यानाल्यांना मोठा पूर आला. रावेर येथे जुना सावदा रावेर रोड वरील नाला दुथडी भरून वाहत होता, हातनूर धरणाचे ४१ दरवाजे संध्याकाळी उघडण्यात आले. तापी नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. रावेर तालुक्यातील गारबर्डी, मंगरूळ अशी धरणे देखील पूर्ण भरून वाहत आहेत.
मोठा वाघोदा गावातील निंभोरा रस्त्यावरील नाल्याला मोठा पूर आल्याने दोन्ही बाजूच्या लोकांचा संपर्क पूर्ण पणे तुटल्याने ग्रामस्थांचे मोठे हाल झाले अनेकांच्या घरात पाणी घुसल्याने मोठे नुकसान झाले, निंभोरा -वाघोदा रस्त्यावरील सुकी नदीवरील लहान पुलावरून पाणी वाहत असल्याने सम्पर्क तुटला . वडगावजवळ नाल्याला पूर आल्याने रावेर-सावदा या रस्त्यावरील वाहतूक काही काळ खंडित झाली होती, मांगी तालुका रावेर येथील रहिवाशी व मोरगाव बुद्रुक येथील सासुरवाडी असलेल्या गणेश कोळी यांचा पाय घसरून हा इसम नदीच्या पाण्याच्या प्रवाहात वाहून जात होता तो काही अंतरावर वाहून गेल्यावर त्याला पोहता येत असल्याने ते सुखरूप बाहेर आला.
पावसामुळे खिर्डीच्या नाल्याला पूर आल्याने संपूर्ण बसस्थानक परिसर पाण्याखाली गेला होता यामुळे बलवाडी, निंभोरा, भामालवाडी या गावांकडे जाणारी वाहतूक खंडीत झाल्याने अनेक लोकांचे मोठे हाल झाले . काही घरांमध्ये पाणी घुसले व्यावसायिकांच्या टपऱ्या पुरात वाहून गेल्याची माहिती मिळाली आहे. उटखेडा कुंभारखेडा रस्त्यावरील सुकी नदीला पूर असल्याने उटखेडा-कुंभारखेडा, पाल- खिरोदा, या रस्त्यांवरील वाहतूक बंद पडली आहे. सावदा-थोरगव्हाण रस्त्यावर पाणी असल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. या ठिकाणी काही घरांमध्ये पुराचे पाणी गेल्याचे समजते. विवरे येथील वाघाडी नाल्याला पूर आल्याने अनेक घरांमध्ये पाणी आहे. त्यामुळे नागरिकांच संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टी मुळे रावेर तालुक्यातील सावदा ,चिनावल, खिरोदा, कुभारखेडा ,खिर्डी विवरा, सह तालुक्या भारतातील गावांमध्ये पावसाचा हाहाकार उडाल्याने जनजीवन विस्कळीत झाले.
सावदा येथील कमल टॉकीज समोरील पाताळगंगा नाला दुथली भरून वाहत होता त्या मुळे येथील वाहतूक काहीकाळ बंद होती मोठया पुलावरून वाहनधारकांना ये-जा करावी लागली,सावद्यात स्टेट बँक समोरील परिसर, मारीमता परिसर,आठवडे बाजार परिसर पूर्ण क्षमतेने पाण्याने वहात होता.फैजपूर रस्त्यावरील साईबाबा मंदिरा समोर हायवे रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचले त्या मुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता.मनाली हॉटेल च्या बाजूला नाल्यात तसेच फैजपूर रोड वरीलच हॉटेल पंजाब , व एम आय डी सी समोरच्या पुलाजवळचा परिसरात पाणी साचले होते.
फैजपूर येथील आठवडे बाजार दोन तीन फुटा पर्यंत पाणी साचल्याने आजचा बुधवारचा बाजार आज भरलाच नाही, येथीलच सुभाष चौक,छत्री चौक,खंडेराववाडी परिसर,तहानगर,आदी परिसर तसेच फैजपूर च्या पुलाखालून अर्ध्या पुला पर्यंत पाणी वाहत होते. यावल ची हडकाई नदी पूर्ण क्षमतेने वहात आहे. पाण्या मुळे खरिपाच्या हंगामासह, बागायती पिकांना मोठा फटका बसला आहे या मुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेकडो हेक्टर जमीनीवर पाण्याचे तलाव साचले असून गावाच्या चारही बाजूने पाण्याने वेढा टाकल्याने संपूर्ण वाहतूकसह रहदारी मार्ग बंद पडला आहे यात ग्रामस्थ, शेतकरी, विद्यार्थी यांची मोठी पंचाईत झाली .