रसलपूर येथे तुंबळ हाणामारी : दोन जखमी, परस्परविरोधी दंगलीचा गुन्हा दाखल
रावेर, मंडे टू मंडे न्यूज वृत्तसेवा : किरकोळ वादातून शिव्या देत असल्याच्या कारणावरून वरून रावेर तालुक्यातील रसलपूर गावात दोन कुटुंबात तूफान हाणामारी झाल्याने या बाबत रावेर पोलिसस्टेशनला ११ जणांन वर एकमेका विरोधात दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून यात दोन जण जखमी झाले आहेत.
या संदर्भात अधिक माहिती अशी की,रावेर येथून जवळच असलेल्या रसलपूर गावात नबाब शेख,वय ४२ यांचा मुलगा आपल्या बक-या बांधत असतांना आपल्याच मुलाला शिव्या देत होता.परंतु हसनुर बी शेख कुरेशी,वय ५५ यांचा असा समज झाला की, नबाब शेख आपल्यालाच शिव्या देत आहे.यांच्या समजाने याचा राग आल्याने दोघा कुटुंबात तुंबळ मारामारी झाली यात दोन जण जखमी झाले आहे.
याबाबत रावेर पोलिसस्टेशनला एकमेकांविरोधात दंगलीचा गुन्हा दाखल झाला असून हसनुर बी शेख कुरेशी यांच्या सह यांच्या गटाचे अल्ताफ शेख, हंसार शेख, अकबर शेख, शबनम शेख, ईस्ताक शेख,तर नबाब शेख याच्या सह त्यांच्या गटाचे सायराबी शेख, मुस्कान शेख, अनिस शेख, शफीक शेख, या दोघा कुटुंबातील सदस्यांवर रावेर पोलिसस्टेशनला दंगलीचा गुन्हा दाखल झाला आहे.