RBI ची बजाज फायनान्सवर मोठी कारवाई; कर्ज वितरण करण्यावर घातली बंदी !
नवी दिल्ली, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क | सेंट्रल रिझर्व्ह बँकेने बजाज फायनान्सच्या eCOM आणि Insta EMI कार्डला कर्ज मंजूर करणे आणि कर्ज वितरण करण्यावर बंदी घातली आहे.
रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या निवेदनानुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कायदा, 1934 च्या कलम 45L (1) (B) अंतर्गत, बजाज फायनान्स लिमिटेडला कर्ज मंजूरी आणि वितरण थांबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे ग्राहकांना आता eCOM आणि Insta EMI कार्ड वरुन कर्ज मिळणार नाही.
रिझर्व्ह बँकेचा हा आदेश ‘इकॉम’ आणि ‘इन्स्टा ईएमआय कार्ड’ या बजाज फायनान्सच्या दोन कर्ज उत्पादनांना लागू होईल. रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार, कंपनीने डिजिटल कर्ज मार्गदर्शक तत्त्वांच्या तरतुदींचे पालन केले नाही.
अलीकडेच RBIने बँका आणि NBFC साठी IT गव्हर्नन्स आणि नियंत्रणाशी संबंधित सर्वसमावेशक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. आयटी गव्हर्नन्समध्ये जोखीम व्यवस्थापनासह इतर व्यवस्थापनाचा समावेश होतो. या संदर्भात, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मार्गदर्शक तत्त्वे, 2023 जारी करण्यात आली आहेत. नवीन मार्गदर्शक तत्त्वे 1 एप्रिल 2024 पासून लागू होतील.