मुख्यमंत्र्यांच्या आणखी १६ लाख ३५ हजार बहिणींना ३००० रुपये रक्षाबंधन भेट
मुंबई, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे अर्ज दखल करण्यास महिलांची मोठी गर्दी उसळली आहे. अर्ज दाखल केलेल्या पैकी ८० लाख पात्र महिलांच्या खात्यात जुलै व आगष्ट अशा दोन महिन्यांचे ३००० रुपये प्रत्येकी जमा झाले आहेत.त्या नंतर आता आणखी १६ लाख ३५ हजार महिलांच्या खात्यात तीन – तीन हजार रुपये पाठविले आहेत. पात्र महिलांना या योजने अंतर्गत दिला जाणारा सन्मान निधी आहे.
राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभ हस्तांतरणाचे काम युद्धपातळीवर सुरू असून १६ लाख ३५ हजार भगिनींच्या खात्यात आज सकाळ पासून ३००० रुपये लाभ जमा झाला आहे. याआधी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येस १४ ऑगस्ट रोजी ३२ लाख महिलांना तर १५ ऑगस्ट रोजी सकाळी ४ वाजता ४८ लाख महिलांना त्यांच्या बँक खात्यात लाभ हस्तांतरित करण्यात आला.
या पूर्वी ८० लाख महिलांच्या खात्यात थेट लाभ हस्तांतरण यशस्वीरीत्या पूर्ण झाले होते. आज आणखी १६ लाख ३५ हजार बहिणींच्या खात्यात ३००० हजार रुपये पाठविण्यात आले असून सद्यस्थितीत एकूण ९६ लाख ३५ हजार महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ यशस्वीरित्या हस्तांतरित झाला असून उर्वरित महिलांनाही लवकरच लाभ मिळावा यासाठी महिला व बालकल्याण विभाग युद्धपातळीवर कार्यरत असून अर्ज दाखल करण्याची ३१ आगस्ट ही अंतिम तारीख नसू या पुढेही अर्ज स्वीकारले जाणार असल्याची माहिती आदिती तटकरे यांनी दिली.