रावेर मतदासंघातील विविध समस्यांबाबत आ. शिरीष चौधरींनी विधानसभेचे वेधले लक्ष
नागपूर, मंडे टू मंडे न्यूज वृत्तसेवा | नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात आमदार शिरीष चौधरी यांनी रावेर विधानसभेतील विविध समस्यांबाबत तारांकीत प्रश्न उपस्थित करत सभागृहाचे लक्ष वेधले.
रावेर तालुक्यात १४ हजार जनावरांना लंम्पी या आजाराने १०९ जनावरांचा मृत्यू झाला असे असताना, यावल व रावेर तालुक्यात पशुसंवर्धन विभागातील व पशुवैद्यकीय दवाखान्यातील अनेक पदे रिक्त असून त सेच रावेर तालुक्यातील केळी पिक घेणार्या सुमारे ८०० शेतकर्यांचे विमा योजनेचे लाखो रुपये विमा कंपनीकडून मिळाला नसल्याने राज्यातील १४९८५ शाळांवर टांगती तलवार असून गैरसोयीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत असल्याचे सांगत सभागृहाचे लक्ष वेधले.
जळगाव जिल्ह्यात प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या सुमारे ५ हजार ५५० महिला लाभार्थ्यांचे सुमारे २ कोटी ७५ लाख रुपये अनुदान प्राप्त झालेल झाले नाही त्यांना तात्काळ अनुदानाचा लाभ मिळावा अशी मागणी केली. रावेर तालुक्यातील गायरान जमिनीवर बेकायदेशीर अतिक्रमण केलेल्या अतिक्रमणधारकांना अतिक्रमण काढून घेण्या बाबत त्यांनी मुद्दा उपस्थित केला. तालुक्यातील तांदळवाडी येथील १०५ प्रकल्पग्रस्तांच्या कुटुंबे नवीन गावठाणात पुनर्वसन प्लॉट मिळण्याबाबत आ. चौधरींनी मुद्दा उपस्थिस केला.
रावेर नगरपालिका हद्दीत सन २०२२-२३ ते २०२५-२६ ही चतुर्थ कर आकारणी हद्दीतील व हद्दी बाहेरील मालमत्तेची अवास्तव कर आकारणी केली जात असल्या बाबत आमदार शिरीष चौधरी यांनी प्रश्न उपस्थित करत कारवाईची मागणी केली आहे.महाराष्ट्र-मध्यप्रदेश सिमेवरुन मोठ्या प्रमाणात अवैध गुरांची वाहतूक सुरु आहे. पाल मार्गे काही महिन्यांपूर्वी सुकी नदित फेकलेल्या २३ मृत गुरांचा संदर्भ देत यातील गौ तस्करांवर कठोर कारवाईची मागणी केली. परिसरातून मोठ्या प्रमाणात अवैध गोवंश तस्करी होत असल्याने त्यांनी याबाबत कारवाईची मागणी केली.