ब्रेकिंग : जळगावा आर. एल. ज्वेलर्स समूहावर ईडीची धाड !
जळगाव, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क | जळगाव शहरातील प्रसिद्ध सराफ व्यावसायिक राजमल लखीचंद ज्वेलर्समध्ये (Rajmal Lakhichand Jewellers) सक्त वसुली संचालनालय (ED) आणि आयकर विभागाकडून धाड टाकत चौकशी सुरू आहे.
आर. एल. समुहाच्या जळगावच्या सराफ बाजारातील पेढीवर आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास सक्त वसुली संचालनालय म्हणजेच ईडीच्या पथकाने छापा टाकून झडती घेण्याचे काम सुरु केले आहे. या ग्रुपच्या पेढीसमोर पथकाची चारचाकी वाहने लागली असून, सर्व दरवाजे बंद करून तपासणी सुरु आहे.
मंगळवारी सकाळीच सीबीआयचे पथक जळगाव शहरात दाखल झाले. आर. एल. ज्वेलर्स तसेच ईश्वरबाबूजी जैन यांच्या निवास्थानांची पथकाने कसून तपासणी केली. तसेच त्यांच्या मालकीच्या ‘मानराज मोटर्स’ व ‘नेक्सा’ या दोन दालनांमध्ये तपासणी करण्यात आली. यासोबतच काल दिवसभरात आर. एल. ज्वेलर्स समूहाशी संबंधित नाशिक आणि पुणे याठिकाणी देखील छापे टाकण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
अद्याप या बाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पथक गाड्या बाहेर लावून आतमध्ये तपासणी करत असल्याचे समजत आहे. थोड्याच वेळात आम्ही बातमी अपडेट करत आहोत.