भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमभुसावळ

अश्लील व्हिडीओ व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी देत वारंवार पैशांची मागणी

भुसावळ, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | अश्लील व्हिडिओ व्हायलर करून बदनामी करण्याची धमकी देत ब्लॅकमेल करून वारंवार पैसे मागण्याचा प्रकार भुसावळ मध्ये उघड झाला. भुसावळ येथे एका ३६ वर्षीय रेल्वे कर्मचाऱ्याला अश्लील व्हिडीओ व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी देऊन तब्बल ३१ हजार रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित रेल्वे कर्मचाऱ्याने मोबाईलवर एक अनोळखी अँप डाऊनलोड केले होते. या अँप च्या माध्यमातून त्यांची एका व्यक्तीशी ओळख झाली. या ओळखीचा फायदा घेत तिसऱ्या एका व्यक्तीने या दोघांचा अश्लील व्हिडीओ तयार केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर आणि तुमच्या संपर्कातील व्यक्तींना पाठवून तुमची बदनामी करू, अशी धमकी  दिली.

बदनामीच्या धाकाने घाबरलेल्या रेल्वे कर्मचाऱ्याकडून संशयितांनी वारंवार पैशांची मागणी केली. लोकलज्जेस्तव पीडित कर्मचाऱ्याने ऑनलाइन माध्यमातून एकूण ३१ हजार रुपये संशयितांच्या खात्यावर पाठवले. मात्र, तरीही पैशांची मागणी थांबत नसल्याने अखेर त्यांनी सायबर पोलिसांकडे धाव घेतली.

घडलेल्या या प्रकारानंतर, पीडित कर्मचाऱ्याच्या तक्रारीवरून जळगाव सायबर पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. सायबर पोलीस या प्रकरणाचा तांत्रिक तपास करत असून,
नागरिकांनी अनोळखी अँप्स आणि सोशल मीडियावरील लोकांशी संवाद साधताना काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!