भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराष्ट्रीयशैक्षणिकसामाजिक

मोठी बातमी : शालेय विद्यार्थ्यांची प्रजासत्ताक दिनाची सार्वजानिक सुट्टी रद्द, राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l महाराष्ट्रासह संपूर्ण देशात प्रजासत्ताक दिन म्हणून २६ जानेवारी हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी सकाळी शाळेत झेंडा वंदन झाल्यानंतर देशात सर्वत्र शालेय विद्यार्थ्यांना सार्वजानिक सुट्टी दिली जाते. मात्र या पुढे आता शालेय विद्यार्थ्यांना ही सुट्टी मिळणार नाही. महाराष्ट्र सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने प्रजासत्ताक दिनाची सुट्टी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी याबाबतचं परिपत्रक जारी करण्यात आलं आहे.

विद्यार्थ्यांना सुट्टी देण्याऐवजी शाळा प्रशासनाने शाळेत देशभक्ती पर कार्यक्रमांचं आयोजन करावं आणि विद्यार्थ्यंमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना निर्माण करावी, असे निर्देश शालेय शिक्षण विभागाने दिले आहेत. त्यामुळे या वर्षी पासून महाराष्ट्रात शालेय विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाची सुट्टी मिळणार नाही. याऐवजी त्यांना शाळेतील विविध कार्यक्रमांना आणि स्पर्धांना उपस्थित राहावं लागणार आहे. या दिवशी कोणते कार्यक्रम घ्यावेत, यासाठी आठ स्पर्धा आणि कार्यक्रमांची यादी देण्यात आली आहे. त्यामध्ये ध्वजारोहणानंतर प्रभातफेरी, वक्तृत्व स्पर्धा, कविता स्पर्धा, नृत्य, चित्रकला, निबंध आणि क्रीडा स्पर्धा आणि प्रदर्शन यांचा समावेश करण्यात आला आहे. हे सगळे कार्यक्रम देशभक्तीपर थीमवरच असावेत, असं पत्रकात म्हटलं आहे. जिल्हा शिक्षणाधिकारी आणि शिक्षण निरीक्षकांना निर्देशाची अंमलबजावणी करावी लागणार आहे.

शालेय शिक्षण विभागाने मंगळवारी एक परिपत्रक जारी करून सर्व सरकारी आणि खाजगी शाळांना प्रजासत्ताक दिनी शाळेत दिवसभर देशभक्ती थीमसह विविध स्पर्धा आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे निर्देश दिले आहेत. “२६ जानेवारीच्या दिवशी आपल्या विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्राचा इतिहास, आपली महान संस्कृती आणि देशाचे भविष्य याबद्दल राष्ट्रीय अभिमानाची भावना निर्माण केली पाहिजे. त्यामुळे २६ जानेवारी २०२५ पासून प्रजासत्ताक दिन सर्व माध्यमांच्या सर्व सरकारी आणि खाजगी शाळांमध्ये विविध कार्यक्रमांसह साजरा केला जाईल,” असे परिपत्रकात नमूद केलं आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!