रावेर तालुक्यातील ८२ ग्रामपंचायतींचे सरपंच पदा साठी आरक्षण जाहीर
रावेर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | आज रावेर तालुक्यातील सुमारे ८२ ग्रामपंचायती च्या सरपंच पदासाठी आरक्षण काढण्या साठी रावेर तहसील कार्यालयात तहसीलदार बी ए कापसे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती.
आरक्षण सोडत काढणे कामी निवासी नायब तहसीलदार संजय तायडे, नायब तहसीलदार आर डी पाटील, मंडळ अधिकारी सचिन पाटील, विठोबा पाटील, यासीन तडवी, भूषण कांबळे यांनी सहकार्य केले.
रावेर तालुक्यातील ८२ ग्रामपंचायती पैकी अनुसूचित जातीसाठी- १३, अनुसूचित जमातीसाठी-११, तर ना.मा.प्र.साठी- १५ ग्रामपंचायतीचे सरपंच पद आरक्षित करण्यात आले आहे. तर उर्वरित ४३ ग्रामपंचायत सर्वसाधारण वर्गासाठी आहेत. दुपारी चार वाजता होणाऱ्या बैठकीत महिला आरक्षण काढण्यात येणार असल्याचं सांगण्यात आले आहे.
ग्रामपंचायत निहाय आरक्षण या प्रमाणे : –
अनुसूचित जाती : विवरे खुर्द, कुंभारखेडा, मस्कावद बुद्रुक, मांगी-चूनवाडे, सावखेडा बुद्रुक, पाडले खुर्द, धामोडी, खिरोदा प्र. रावेर, कळमोदा, गहुखेडा, खानापूर, मुंजलवाडी, वाघोदे खुर्द
अनुसूचित जमाती : चिनावल, मस्कावद सीम, भोर, सुद्गाव, कोचुर बुद्रुक, निरूळ, दोधे, थेरोळे, नेहेता, पुनखेडा, वाघोड
नामाप्र : उटखेडा, सुनोदा, वाघोदा बुद्रुक, कर्जोद, अजनाड-चोरवड, थोरगव्हाण, विवरे बुद्रुक, सिंगत, रणगाव, अहिरवाडी, खिर्डी खुर्द, खिर्डी बुद्रुक, रमजीपूर, वाघाडी, अजंदे,
सर्वसाधारण :
रेंभोटा, पुरी-गोलवाडा, गाते, कोचुर खुर्द, गौरखेडा, भोकरी, रायपुर, कोळोदे, केऱ्हाळा खुर्द, नांदूरखेडा, सावखेडा खुर्द, वडगाव, तासखेडा, भातखेडा, बलवाडी, केऱ्हाळा बुद्रुक, खिरोदा प्र. यावल, रसलपूर, उदळी बुद्रुक-लूमखेडा, रोझोदा, विटवे, तांदलवाडी, निंबोल, तामसवाडी-बोरखेडा, अंदलवाडी, ऐनपूर, उदळी खुर्द, शिंगाडी, मोरगाव खुर्द, खिरवड, अटवाडे, पातोंडी, मांगलवाडी, सुलवाडी, निंभोरासीम, कांडवेल, शिंदखेडा, बक्षीपूर, मस्कावद खुर्द, मोरगाव बुद्रुक, निंभोरा बुद्रुक, धुरखेडा, दसनूर-सिंगनूर