यावल तालुक्यात ६३ ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदाचे आरक्षण जाहीर, नव्या नेतृत्वाला मिळणार संधी !
यावल/ पाडळसे, मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी | यावल तालुक्यातील ६३ ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदाचे आरक्षण आज २१ एप्रिल रोजी यावल तहसील कार्यालयात दुपारी २ वाजता जाहीर करण्यात आले. तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या अध्यक्षतेखाली ही प्रक्रिया पार पडली. यावेळी महसूल कर्मचारी, ग्रामस्थ व इच्छुक उमेदवार उपस्थित होते.
अनुसूचित जमाती (एसटी): २१ ग्रामपंचायती
अनुसूचित जाती (एससी): ८ ग्रामपंचायती
इतर मागासवर्गीय (ओबीसी – नामाप्र): २ ग्रामपंचायती
सर्वसाधारण प्रवर्ग: ३२ ग्रामपंचायती
आरक्षणानुसार ग्रामपंचायतींची नावे –
एसटी प्रवर्ग: भालशीव, बोरावल बु., मोहराळे, वढोदे प्र. यावल, बोरखेडा बु., सावखेडे सिम., वड्री खु., मनवेल, किनगाव बु., पिळोदे खु., कोसगाव, मारुळ, पाडळसे, सांगवी खु., बोरावल खु., थोरगव्हाण, बोराळे, बामणोद, विरोदे, चिखली बु., राजोरा.
एससी प्रवर्ग: पिंप्री, सांगवी बु., अट्रावल, कोळवद, हंबर्डी, म्हेसवाडी, पिंपरुळ, नावरे.
ओबीसी प्रवर्ग (नामाप्र): चिखली खु., वडोदे प्र. सावदा.
सर्वसाधारण प्रवर्ग: न्हावी प्र. अडावद, चुंचाळे, शिरागड, कासवे, कासारखेडा, नायगाव, आडगाव, गिरडगाव, डांभुर्णी, शिरसाड, दुसखेडा, चिंचोली, कोरपावली, अंजाळे, विरावली बु., डोंगर कठोरा, किनगाव खुर्द, आमोदे, निमगाव, हिंगोणे, सातोद, महेलखेडी, उंटावद, साकळी, न्हावी प्र. यावल, भालोद, पिळोदे बु., चितोडा, दहिगाव, टाकरखेडा, वनोली, डोणगाव.
नव्या नेतृत्वाला संधी
या आरक्षण प्रक्रियेमुळे गावपातळीवर नव्या नेतृत्वाच्या संधी निर्माण झाल्या असून, महिला व युवा उमेदवारांना स्थानिक स्वराज्य संस्थेत सहभागी होण्याचा मार्ग खुला झाला आहे.