भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

मुक्ताईनगरराजकीय

संजय गांधी निराधार योजनेसह अर्थसहाय्य योजनेची अजून प्रलंबित प्रकरणे निकाली काढा– रोहिणी खडसे

Monday To Monday News Network|

मुक्ताईनगर तहसील कार्यालयातून अनेक दाखल प्रकरणे गहाळ– राष्ट्रवादीचा आरोप

मुक्ताईनगर, मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधि- अक्षय काठोके| संजय गांधी निराधार योजना,इंदिरा गांधी वृद्धपकाळ योजना, श्रावण बाळ योजना इ योजनां द्वारे शासनातर्फे समाजातील विधवा, अपंग, निराधार, वृध्द यांना मासिक मानधन दिले जाते परंतु तहसील कार्यालय मुक्ताईनगर येथे दाखल केलेली संगायो, इंदिरा गांधी योजना ,श्रावण बाळ योजनेची प्रकरणे मंजूर होत नाहीत अशी नागरिकांची ओरड असल्याचे व सन 2022-2023 मधील हजारो प्रकरणे मंजूर न केल्या बाबत लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळत नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी माजी मंत्री आ एकनाथराव खडसे यांनी तहसील कार्यालय मुक्ताईनगर येथे घेतलेल्या आढावा बैठकीत निदर्शनास आणून दिले होते

त्यानंतर घाईघाईने संबंधित विभागाने दोनच दिवसात यातील प्रकरणे मंजूर केली होती मात्र तरी सुद्धा 2022- 23 मधील दाखल शेकडो प्रकरणे पात्र असून सुद्धा अजून पर्यंत मंजूर केले नाहीत तर काही प्रकरणात नियम नसताना सुद्धा वयाच्या दाखल्याची त्रुटी दाखवून नामंजूर केले आहेत अशी नागरिकांची तक्रार आल्या नंतर आज अ‍ॅड.रोहिणी खडसे यांनी तहसील कार्यालय मुक्ताईनगर येथे जाऊन माहिती घेतली असता धक्कादायक बाब निदर्शनास आली 2022 -2023 मधील शेकडो च्या वरती प्रकरणे अजून प्रलंबित असून त्यातील बरेचसे प्रकरणे गहाळ झाली आहेत तर काही प्रकरणे पात्र असताना सुद्धा त्यात नाहक त्रुटी दाखवून ते मंजूर केली नाहीत. विधवा आणि अपंग यांना प्रकरण दाखल करते वेळी वयाच्या दाखल्याची अट नसताना सुद्धा विधवा, अपंग यांचे प्रकरणे वयाचे दाखले नसल्याची अट दाखवून नामंजूर केले आहेत वास्तविक अपंग, विधवा यांना वयाच्या दाखल्याची अट नसते कमलाबाई शामराव पाटील या रुईखेडा येथील अपंग असलेल्या वृद्ध महिला आहेत त्यांच्याकडे उपजीविकेचे कुठलेही साधन नाही त्यांनी अपंग दाखला जोडलेला असताना सुद्धा वयाच्या दाखल्याचे कारण देऊन त्यांचे प्रकरण नामंजूर करण्यात आले होते

असे अंध, अपंग, विधवा, वृद्ध यांची शेकडो प्रकरणे विनाकारण अडवून ठेवल्याचे तर काही दाखल प्रकरणे गहाळ झाल्याचे निदर्शनास आले संगायो समितीने बैठक घेतल्या नंतर जी प्रकरणे मंजूर केली जातात त्याची यादी तत्काळ तहसील कार्यालयात लावून त्याची माहिती लाभार्थ्यांना देण्याचा नियम असताना सुद्धा 15-15 दिवस यादी प्रसिद्ध करण्यास उशीर लावला जातो या कालावधीत हि यादी बाहेरील काही लोकांना देऊन लाभार्थ्यांकडून हे लोक पैसे वसूल करतात सोयीस्करपणे काही निवडकच लोकांना न्याय देऊन बाकी प्रकरणे त्रुटीचे कारण देऊन नामंजूर केली जातात प्रकरणात असलेली त्रुटी गरीब लाभार्थ्यांना सांगीतली जात नाही असे करून लाभार्थ्यांना योजनेपासून वंचित ठेवण्याचे कारनामे सं गा यो समिती करत असल्याचे काही उपस्थित अर्ज धारक लाभार्थ्यांनी तिथे सांगितले .

यासंदर्भात अ‍ॅड.रोहिणी खडसे यांनी उपस्थित प्रभारी तहसीलदार वाडे यांना बाबत विचारणा करून आढावा घेतला व प्रलंबित प्रकरणे लवकरात लवकर निकाली काढण्याची विनंती केली तसेच भविष्यात जर गोरगरीब लाभार्थ्यांना अशा प्रकारचा त्रास दिला तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा तर्फे तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष यु.डी. पाटील सर, शहराध्यक्ष राजेंद्र माळी, युवक शहराध्यक्ष बबलू सापधरे, सरचिटणीस सुनिल काटे,असिफ बागवान, रउफ खान, संजय कपले, बापू ससाणे, नंदकिशोर हिरोळे, संजय कोळी, मूस्ताक मण्यार, जुबेर अली, अय्याज पटेल, राहुल पाटील, निलेश भालेराव, भूषण वानखेडे, अजय आढायके, चेतन राजपूत आणि पदाधिकारी उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!