भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

यावलरावेर

रिक्षांची समोरासमोर धडक, भीषण अपघातात सावदा येथील तरुणीचा मृत्यू

सावदा, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | फैजपूर- भुसावळ मार्गावरील फैजपूर – अमोदा दरम्यान आज रविवार ४ मे रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास समोरासमोरून येणाऱ्या दोन ॲपे रिक्षांची जोरदार धडक होऊन मोठा भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात सावदा येथील एका तरुणीचा मृत्यू झाला असून काही प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार,  क्रमांक MH 19 CW 3590 ची
रिक्षा प्रवासी घेऊन अमोदा येथून फैजपूरकडे येत होती, तर क्रमांक MH 19 7064 ही मालवाहू सरपण भरलेली  रिक्षा फैजपूर कडून अमोदा दिशेने जात होती. यातया दोन्ही रिक्षांची समोरासमोर अचानक जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात सावदा येथील दंतचिकित्सक डॉ. सोपान खडसे यांची कन्या अदिती सोपान खडसे हिचा दुर्दैवी मृत्यू झाला असून इतर प्रवाशांना गंभीर दुखापती झाल्या आहेत. घटनास्थळी फैजपूर पोलीस दाखल झाले असून सर्वांना तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पुढील कारवाई फैजपूर पोलिस करत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!