निंभोरा येथील रस्त्याचे काम अर्धवट, महिनाभरापासून वाहनधारकांना मनस्ताप
निंभोरा, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज | निंभोरा बु: ता: रावेर येथील एसटी स्टँड पासून ते उड्डाणपुलापर्यंत अंदाजीत २ कोटी रुपये निधी मंजूर होऊन रस्त्याच्या काम सुरू झाले आहे. यात दोन्ही बाजूने गटारी व रस्ता असे प्रस्तावित असून पुढील रस्त्याचे काम रखडल्याने याचा त्रास गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जास्त प्रमाणात त्रास होत आहे. निधी मिळत नसल्याने ठेकेदाराने गाशा गुंडाळला असे सुज्ञ नागरिकांकडून बोलले जात आहे. निर्माणाधीन रस्त्याला लागून असलेल्या संभाजीनगर,जिजाऊ नगर, इंदिरानगर, पंचशील नगर या भागातील समांतर रस्ते जोडणी झाले नसल्याने रहिवाशी त्रासले आहे.
‘आमचा जीव गेल्यावरच प्रशासनाला जाग येणार का?,असा संतप्त सवालही वाहनधारकांकडून उपस्थित होत आहे ठेकेदाराने हे काम अर्धवट नागरिकांना फार मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अवजड वाहन वाहतूकमुळे एकेरी अरुंद रस्त्यावर प्रचंड वाहतुकीच्या कोंडीला सामोरे जावे लागत आहे याबाबत संबंधित ठेकेदार हा अतिशय संथगतीने काम करत असल्याचे पादचारी व छोटे चारचाकी वाहनधारक तसेच मोटरसायकल ही गावातून वाहतूक होत असल्यामुळे गावात ट्रॅफिक जामची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे भांडण तंटे निर्माण होत आहे. या बाबीचा केळी वाहतुकीसाठी आलेल्या वाहतुकीवर ही परिणाम झाला आहे.
संबंधित ठेकेदाराने सदरील काम लवकरात लवकर करावे अशी मागणी निंभोरासह पंचक्रोशीतून होत आहे. निंभोरा हे गाव पंचक्रोशीतील बाजारपेठेचे गाव असल्याने येथील आठवडे बाजाराच्या इतर जीवनावश्यक वस्तूसाठी येणाऱ्या व्यापारी, महिलावर्ग शेतकरी, शेतमजूर ,सर्वांना मनस्ताप होतआहे. या संदर्भात वरील काम सुरू न झाल्यामुळे याचा केळी वाहतुकीसह पंचक्रोशीत बाजारासाठी आलेल्या नागरिकांची फार मोठी गैरसोय झाली.
अपूर्ण राहिलेल्या या रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडलेले असून वाहन चालकाला जीवघेणी कसरत करावी लागत आहे एखाद्या वेळी समोरून वाहन आले तर दुहेरी निघत नसल्याने वादविवाद तंटे होत आहे. यामुळे वाहनचालकांमधून संतप्त भावना व्यक्त होत आहेत या संदर्भात संबंधित लोकप्रतिनिधींसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेऊन अर्धवट रस्त्याचे काम पूर्ण करावे अशी मागणी होत आहे.
ऐन पावसाळ्यात सदरील काम सुरू झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर त्रास होत आहे. या रस्त्यावर ग्रामपंचायतची गावाला पाणीपुरवठा पाईपलाईन असल्याने अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे ती ठिकठिकाणी लिकेज झाली असून यामुळे आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. संबंधित ठेकेदाराने हे काम अर्धवट केल्यामुळे गणेशोत्सव व दुर्गोत्सव डोळ्यासमोर ठेवून ग्रामपंचायत प्रशासनाकडून स्वखर्चाने लिकेज सोडण्याचे हे काम करावे अशी
मागणी सर्वसामान्यातून होत आहे.

