जनसंवाद यात्रेत बोदवड तालुक्यातील ग्रामस्थांशी रोहिणी खडसेनी साधला संवाद
मुक्ताईनगर, मंडे टू मंडे न्यूज प्रतिनिधी : राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसेंच्या संकल्पनेतून मुक्ताईनगर मतदार संघात १५ ऑगस्टपासून जनसंवाद यात्रा सुरू करण्यात आली असून या यात्रेच्या सातव्या दिवशी बोदवड तालुक्यातील ग्रामस्थांशी संवाद साधत रोहिणीताई खडसे यांनी साधला आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष पाटील म्हणाले, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे हात मजबूत करण्यासाठी सर्वांनी रोहिणी खडसेंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांनी साळशिंगी येथील जाहीर सभेत केले. यावेळी रोहिणी खडसे यांनी जनसंवाद यात्रे दरम्यान करंजी पाचदेवळी, भानखेडा, गोळेगाव, साळशिंगी या गावातील ग्रामस्थांशी संवाद साधला. यात्रेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील,जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष पवन राजे पाटील,बोदवड राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष आबा पाटील,
मुक्ताईनगर तालुका अध्यक्ष यु. डी. पाटील सर, राष्ट्रवादी शहराध्यक्ष प्रदिप बडगुजर,बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, बाजार समिती संचालक रामदास पाटील,नगरसेवक भरत अप्पा पाटील,रा कॉ चे गटनेते जाफर शेख,लतिफ शेख,दिपक झंबड,कैलास चौधरी, भागवत टीकारे, अनिल वराडे ,अनिल पाटील, हकीम बागवान,माजी सभापती किशोर गायकवाड,विलास धायडे, जिल्हा युवक कॉ. चे संघटक अतुल पाटील, युवक तालुका अध्यक्ष विनोद कोळी,जि प सदस्य निलेश पाटील,दीपक वाणी, गोपाळ गंगतिरे, सम्राट पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.