भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

मुक्ताईनगरराजकीय

आपल्या माणसांनी केलेला सत्कार पक्ष संघटन वाढीसाठी, जनसेवेसाठी प्रेरणा आणि बळ देत राहील– रोहिणी खडसे

मुक्ताईनगर, मंडे टू ममंडे न्युज प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष पदी रोहिणी खडसे यांची निवड करण्यात आली आहे प्रदेशाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारल्या नंतर दि 31रोजी यांचे मुक्ताईनगर येथे प्रथमच आगमन झाले प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा तर्फे खडसे यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ढोल ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतिषबाजीने रोहिणी खडसे यांचे स्वागत करण्यात आले त्यानंतर मोठया पुष्पहारा द्वारे अभिनंदन करण्यात आले.

यावेळी जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे, तालुका अध्यक्ष यु डी पाटील, बोदवड बाजार समिती सभापती सुधिर तराळ, रावेर बाजार समिती सभापती सचिन पाटील, सोपान पाटील,निवृत्ती पाटील, रमेश नागराज पाटील , सुधाकर पाटील, दशरथ कांडेलकर,विलास धायडे राजेंद्र माळी,भागवत पाटील, रामभाऊ पाटील,दिपक पाटील, अनिल वराडे, अनिल पाटील, संदीप देशमुख , असगर भाई,दिपक पाटील , रंजना कांडेलकर, लता सावकारे, अश्विनी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती

यावेळी रोहिणी खडसे म्हणाल्या, शरद पवार व इतर नेत्यांनी माझ्यावर विश्वास टाकत प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आहे मी त्याबद्दल त्यांची आभारी आहे आज मातृभूमी मुक्ताईनगर येथे तुम्हा सर्वांनी माझा सत्कार केला आपल्या माणसांनी केलेला हा सत्कार अनमोल आहे तो मला भविष्यात पक्ष संघटन वाढीसाठी आणि जनसेवे साठी प्रेरणा आणि बळ देत राहील पक्ष नेतृत्वाने दिलेली जबाबदारी सक्षमपणे पार पाडण्यासाठी तुम्हा सर्वांचे आशीर्वाद आणि सहकार्याची आवश्यकता आहे तुमच्या सर्वांच्या सोबतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संघटन वाढवून पक्षाचे विचार तळागाळार्यंत पोचविण्याचा माझा प्रयत्न राहिल प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी पार पाडत असताना मला राज्यभर दौरे करावे लागतील त्यावेळी मतदारसंघाकडे तुम्हा सर्व पदाधिकाऱ्यां आणखी लक्ष द्यावे लागेल असे रोहिणी खडसे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना आवाहन केले यावेळी मायभूमीत झालेल्या सत्काराने रोहिणी खडसे भावुक झाल्या होत्या

यावेळी रविंद्र दांडगे, सुनिल काटे,बबलू सापधरे, प्रविण पाटील, मस्तान कुरेशी, शकील सर, हरिष ससाणे, एजाज खान, नंदकिशोर हीरोळे, विकास पाटील,प्रदीप साळुंखे, रउफ खान, मेहमूद भाई, संजय कोळी, बाळा भालशंकर, दिपक साळुंखे, मुन्ना बोंडे,विजय चौधरी, प्रदीप बडगुजर, अमोल महाजन, निवृती महाजन, कापसे,हशम शहा, अन्नू पेंटर, शिवाजी ढोले, बाळा सोनवणे, साहेबराव पाटील, जितेंद्र पाटिल, राहुल पाटील, निलेश भालेराव, अजय तळेले, चेतन राजपूत, अजय अढायके, मयुर साठे आणि पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!