जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून सुटली चिचखेड प्र बो ग्रामस्थांच्या रस्त्याची समस्या
मुक्ताईनगर, मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रांत राष्ट्रवादी जनसंवाद यात्रे दरम्यान चिंचखेड प्र बो गावाला जोडणारा रस्त्याची समस्ये प्रश्न राष्ट्रवादी नेत्या रोहिणी खडसे खेवलकर यांनी मुरूम टाकून मार्गी लावला आहे.
राष्ट्रवादी जनसंवाद यात्रा दि 21 ऑगस्ट 2022 रोजी बोदवड तालुक्यातील चिंचखेड प्र बो येथे गेली स्थानिक ग्रामस्थांनी बोदवड – चिखली- चिचखेड प्र बो रस्त्यावर चिचखेड गावाजवळील एक किलोमीटर रस्ता खराब रस्त्याची समस्या राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे खेवलकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना सांगितली यामुळे चिचखेड गावात येणारी बस बंद झाली होती त्यामुळे गावातील शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची तसेच गावातील लोकांची गैरसोय होत असल्याने खाजगी प्रवासी वाहनाने बोदवड येथे जावे लागत असून यात वेळ आणि पैशांचा अपव्यय होत असल्याचे व्यथा ग्रामस्थांनी मांडली होती. हि समस्या चिंचखेड प्र बो च्या ग्रामस्थांनी महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाच्या उपाध्यक्षा रोहिणी ताई खडसे खेवलकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसमोर मांडली होती यावेळी रोहिणी खडसे खेवलकर यांनी
यावर रस्त्याची समस्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सध्या स्थितीत मुरूम टाकून व नंतर आ. एकनाथराव खडसे यांच्या निधीतून रस्त्याचे डांबरीकरण करून रस्त्याची समस्या सोडविण्यात येईल असे आश्वासन दिले होते सौ. खडसेंनी दिले होते त्यानुसार आज दि 31 ऑगस्ट रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्या एक किलोमीटर रस्त्यावरील खड्डे मुरूम टाकून बुजविण्यात आले असून गावात बस येण्याचा मार्ग मोकळा होऊन चिचखेड प्र बो गावाची बसफेरी पुर्ववत झाली असून विद्यार्थी आणि ग्रामस्थांची होणारी गैरसोय दूर झाली आहे याबद्दल स्थानिक ग्रामस्थांनी आभार व्यक्त केले आहे