हेच आशीर्वाद भविष्यात सामान्यांच्या प्रश्नांसाठी लढायला बळ देतील– रोहिणी खडसे
मुक्ताईनगर, मंडे टू मंडे न्यूज प्रतिनिधी : राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसेंच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या जनसंवाद यात्रे दरम्यान रोहिणी खडसे यांनी बोदवड तालुक्यातील पळसखेड येथील ग्रामस्थांशी सभा घेवून संवाद साधला.
- धक्कादायक : यावल तालुक्यातील सहा वर्षीय चिमुकलीवर अत्याचार
- …तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट ; पुन्हा राज्यात २०१९ ची परिस्थिती
- SSC & HSC Exam : १० वी १२ वी च्या बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जाहीर
‘जन संवाद यात्रेच्या माध्यमातून बोदवड तालुक्यात सुरु असलेल्या संवाद यात्रेच्या आज नवव्या दिवशी पळसखेड येथे ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेताना गावातील थोरा -मोठ्यांचे आशीर्वाद घेतले. हेच आशीर्वाद मला भविष्यात जन सामान्यांच्या प्रश्नांसाठी लढायला बळ देतील असा विश्वास रोहिणीताई खडसे यांनी यावेळी व्यक्त केला. संवाद यात्रेप्रसंगी गावागावात जाऊन नाथाभाऊनी गेल्या 30/35वर्षात बोदवड तालुकावाशियांसाठी केलेल्या विकास कामांचा जसे बोदवड तालुका निर्मिती, बोदवड उपसा सिंचन योजना यासह गावागावातील रस्ते, सभागृह, समाजमंदिरे आदी अनेक कामांचा उजाळा ग्रामस्थांना करून देतात. तसेच समस्या जाणून घेऊन त्याचा आ. खडसेंच्या माध्यमातून पाठपुरावा करणार असल्याचा शब्द देत आहेत.
याप्रसंगी बोरगाव साठी राहिलेला दीड कि. मी.चा रस्ता लवकरच पूर्ण करण्याचे आश्वासन यात्रेप्रसंगी देण्यात आले. यावेळी यात्रा प्रमुख ईश्वर रहाणे, बोदवड राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष आबा पाटील, मुक्ताईनगर तालुका अध्यक्ष यु. डी. पाटील, तालुकाध्यक्ष विलास राजपूत, राष्ट्रवादी शहराध्यक्ष प्रदिप बडगुजर, बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, बाजार समिती संचालक रामदास पाटील, नगरसेवक भरत अप्पा पाटील, रा. कॉ.चे गटनेते जाफर शेख, भागवत टीकारे, अनिल वराडे घाणखेड, अनिल पाटील वरखेड, रामराव पाटील सरपंच हिंगणे, विनोद कोळी सरपंच एनगाव व आदी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.