क्राईमजळगाव

आयकर महिला अधिकाऱ्याच्या खात्यातून परस्पर काढले २६ लाख, जळगाव मधील घटना

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l आयकर अधिकारी असलेल्या महिलेच्या खात्यातून परस्पर २६ लाख रुपये काढून घेतल्याचा प्रकार उघळकीस आला असून ही महिला मुंबई येथे आयकर विभागात अधिकारी पदावर कार्यरत आहे. हा प्रकार जळगाव मध्ये घडला असून या संदर्भात रामानंदनगर पोलिस स्टेशनला शनिवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, संयोजीता मुदीत नागपाल ही महिला मुंबई मध्ये आयकर विभागात अधिकारी पदावर कार्यरत असून तिच्या वडिलांची कुलर कंपनीत भागीदारी होती. कंपनी मालक असलेले वडील यांच्या मृत्यू नंतर त्यांना वारस म्हणून संयोजीता नागपाल ह्यांचे नाव लागले. त्यांच्या बँक खात्यातून गौरव सुनील तिवारी या नावाच्या खात्यावर २६ लाख रुपये परस्पर वर्ग केल्याचा प्रकार उघडकीस आला.

२६ लाखांची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सयोजिता नागपाल याच्या वतीने सुशील कुमार अशोफा, वय ६९ वर्ष. रा. केवल अपार्टमेंट, गणपतीनगर. जळगाव यांनी रामानंद नगर पोलिस स्टेशनला शनिवार रोजी तक्रार दाखल केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!