भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममुक्ताईनगर

मुक्ताईनगर येथे बारावी परीक्षा केंद्रावर तोडफोड; अफसर खानसह १० ते १५ जणांवर गुन्हा दाखल

मुक्ताईनगर, मंडे टू मंडे न्युज अक्षय काठोके | मुक्ताईनगर येथील जे. ई. स्कूलमध्ये सुरू असलेल्या बारावीच्या परीक्षेदरम्यान सोमवारी दुपारी अज्ञात व्यक्तींनी परीक्षा केंद्रात अनधिकृत प्रवेश करून तोडफोड केल्याची घटना घडली. या प्रकरणी शिंदे शिवसेना पक्षाचा राज्यस्तरीय प्रदेश अध्यक्ष पद भूषवणारा अफसर खान याच्यासह दहा ते पंधरा जणांवर मुक्ताईनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परीक्षा केंद्राचे संचालक तथा अंतुर्ली येथील तराळ विद्यालयाचे प्राचार्य प्रकाश रामकृष्ण बाऊस्कर (वय ५८) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सोमवारी बारावीचा भौतिकशास्त्राचा पेपर सुरू असताना दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास एका व्यक्तीने मुख्य प्रवेशद्वारातून परीक्षा केंद्रात अनधिकृत प्रवेश केला. संबंधित व्यक्ती सुमारे एक ते दीड तास मोबाईलवर संभाषण करत होती. त्यानंतर तो केंद्राबाहेर निघून गेला. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

यानंतर दुपारी एक वाजण्याच्या सुमारास परीक्षा केंद्राच्या मागील बाजूने दहा ते पंधरा जणांनी प्रवेश करत खिडक्यांच्या जाळ्या तोडल्या तसेच लोखंडी गेटची तोडफोड केली. या माध्यमातून विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्याचा प्रयत्न झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेमुळे परीक्षा केंद्राच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे.

घटनेनंतर पोलीस प्रशासनाने तत्काळ दखल घेत संबंधितांविरुद्ध गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे. परीक्षा प्रक्रियेत अडथळा आणणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!