क्राईमजळगावधरणगाव

दहा लाख रुपये मागितली लाच, दोन लाख स्वीकारताना संस्था सचिवाला अटक

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l तक्रारदार हा पिंपळकोठा खुर्द ता. एरंडोल जि. जळगांव. वय ५४ वर्षीय पुरुष असून यांचा मुलगा हा वेदमाता गायत्री बहुउद्देशीय संस्था, पिंप्री खुर्द ता. धरणगाव जि. जळगांव संचालित २० टक्के शासकीय अनुदानित आदर्श प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, भोद खुर्द शिवार येथे सन २०२१ पासून अनुसूचित जाती या प्रवर्गातील शिपाई रिक्त पदावर नोकरीस होता. त्यावेळी इलोसे यांनी सुमारे ७ लाख ७० हजार रुपये घेतले होते. त्यानंतर तक्रारदार यांचे मुलास सचिव विनोद मधुकर चौधरी यांनी तक्रारदार यांच्या मुलाचे वय २०१२ पासून फरक काढण्यासाठी कमी असल्याचे सांगुन त्यास शिपाई पदावरून गेल्या महिन्यात कमी केले होते.

सदरची जागा ही सन-२०१२ पासुन रिक्त पद दाखवून त्या जागेवर तक्रारदार यांचा भाचा राजेश यास शिपाई पदावर नोकरी लावण्यासाठी, शासनाकडून मंजुरी आणून देण्यासाठी तक्रारदार यांच्या कडे दिनांक १५/१०/२०२४ रोजी १० लाख रुपये लाच रकमेची मागणी केली. त्यात तात्काळ २ लाख रुपये, शासनाकडून मंजुरी प्राप्त झाल्यावर ३ लाख रुपये व पहिला पगार सुरु होईल तेंव्हा ५ लाख रुपये अशी टप्प्या-टप्प्याने १० लाख रुपयाची मागणी करून या पूर्वी स्वीकारलेले सुमारे ७ लाख ७० हजार रुपये विसरून जा असं सांगितले. व सदर रक्कमेचा पहिला हप्ता म्हणुन २,००,०००/- लाख लाच रक्कम आज दिनांक १७/१०/२०२४ रोजी विनोद मधुकर चौधरी, वय ५३ वर्षे, सचिव, वेदमाता गायत्री बहुउद्देशीय संस्था, पिंप्री खुर्द ता. धरणगाव जि. जळगांव रा.गट नंबर ५३+५४, साई आनंद अपार्टमेंट, शिव कॉलनी, जळगांव, या त्यांचे राहते घरी स्वतः स्विकारली म्हणुन त्यांच्या विरुद्ध रामानंद नगर पोलीस स्टेशन .जळगांव येथे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे .

सदरची कारवाई सापळा पर्यवेक्षक अधिकारी योगेश ठाकूर. पोलीस उपअधीक्षक लाप्रवि जळगांव, सापळा व तपास अधिकारी स्मिता नवघरे, पोलीस निरीक्षक लाप्रवि जळगांव, PSI दिनेशसिंग पाटील, पोना सुनील वानखेडे,पोकॉ प्रणेश ठाकूर, सफौ सुरेश पाटील, पोहेकॉ, रविंद्र घुगे, मपोहेकॉ शैला धनगर, पोना बाळू मराठे, पोना किशोर महाजन ,पोकॉ प्रदिप पोळ पोकॉ ,राकेश दुसाने यांनी केली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!