भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जामनेरराजकीय

जामनेर मध्ये साधनाताई महाजन यांचे सह ६ नगरसेवक बिनविरोध, तिसऱ्यांदा नगराध्यक्षा पदाची संधी, मंत्री गिरीश महाजनांची जादू !

जामनेर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क| येथील नगरपालिकेमध्ये नगराध्यक्षपदाच्या उमेदवार साधनाताई महाजन या बिनविरोध निवडून आले आहेत. ही त्यांची आता तिसरी टर्म आहे. तर ६ नगरसेवक देखील बिनविरोध निवडून आल्याने भाजप तर्फे शहरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

नगराध्यक्ष पदासाठी साधनाताई गिरीश महाजन यांचा एकमेव अर्ज उरला. त्यामुळे त्या बिनविरोध निवडून आल्या. तर प्रभाग क्रमांक ११ ब मधून उज्वला दीपक तायडे, प्रभाग क्रमांक १ अ मधून सपना रविंद्र झाल्टे, प्रभाग क्रमांक १३ अ मधून महेंद्र कृपाराम बाविस्कर, १३ ब मधून किलूबाई गीमल्या शेवाळे, प्रभाग क्रमांक २ मधून श्रीराम महाजन,तर प्रभाग क्रमांक ५ अ मधून संध्या जितेंद्र पाटील हे बिनविरोध निवडून आले आहेत.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला दे धक्का. 

जामनेर नगरपालिका निवडणुकीत साधना महाजन यांची बिनविरोध निवड झाली असून दोन ठिकाणी नगरसेवक पदासाठी देखील शिवसेनेला धक्का देण्यात आला आहे. शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज भरलेल्या दोन उमेदवारांनी अर्ज माघारी घेत भाजपमध्ये प्रवेश केला. जामनेरमध्ये भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवेसेनेचे दोन उमेदवार आमने सामने उभे ठाकले होते. शिंदेंच्या शिवसेनेकडून वॉर्ड नंबर 1 मधून मयुरी चव्हाण आणि वॉर्ड नंबर 13 ब मधून रेशंता सोनवणे यांनी अर्ज दाखल केला होता. तर भाजपकडून वॉर्ड 1 नंबर सपना झाल्टे आणि वॉर्ड नंबर 13 मधून किलुबाई शेवाळे यांनी अर्ज केला होता. त्यामुळे, या ठिकाणी भाजप विरूद्ध एकनाथ शिंदे यांच लढत होणार होती. मात्र,उपमुख्यमंत्री  एकनाथ शिंदे  यांच्या शिवसेनेकडून उमेदवारी दाखल केलेल्या मयुरी चव्हाण आणि रेशंता सोनवणेंकडून अर्ज मागे घेत भाजपमध्ये प्रवेश करण्यात आला.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!