भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमरावेर

तापीकाठ परिसरात अवैध देशी-विदेशी दारूची विक्री, वरणगाव येथील चारचाकीतून पोहचवला जातो मद्यसाठा

तासखेडा ता. रावेर, मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी :  रावेर तालुक्यातील तापी परिसर म्हणून ओळख असलेल्या उदळी- दुसखेडा या भागात अवैध देशी-विदेशी दारू च्या विक्रीतून दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत असून वरणगाव येथून चारचाकी गाडी ने ऑर्डरी प्रमाणे परिसरातील प्रत्येक गावात देशी-विदेशी दारूचे खोके पोहोच दिले जात असतांना पोलीस प्रशासनासह राज्य उत्पादन शुल्क विभाग डोळे मिटून बसल्याचे पाहायला मिळत आहे.

याबाबत अधिक माहीती अशी की, रावेर तालुक्यातील तापी काठच्या परिसरातील प्रत्येक गावात अनेक ठिकाणी अवैध देशी-विदेशी दारूची दुकाने थाटली असून या परिसरात दररोज लाखो रुपयांची दारूची उलाढाल होत असते, वरणगाव येथून चारचाकी ओमनी गाडी या परिसरात दररोज येत असते, या गाडीत देशी-विदेशी सह सर्व प्रकारची दारूच्या बाटल्यांनी भरलेले खोके असतात, ही चारचाकी गाडी वरणगाव पासून प्रत्येक गावात माल पोहोच करत, तपत कठोरा, हतनूर, सावदा स्टेशन गाते, टहाकळी, उदळी, रायपूर, तासखेडा, सुदगाव, दुसखेडा अशा परिसरातील सावदा व वरणगाव पोलीस स्टेशन हद्दीतील गावांत दारू पोहचवत असते. दररोज भर दिवसा एव्हढ्या मोठ्या प्रमाणात मद्यसाठा घेऊन चार चाकी गाडी येतेच कशी? हा संशोधनाचा विषय असून याबाबत संबंधित विभागाला माहिती नसणे म्हणजे नवलच की…!

तासखेडा गावात अवैध दारुचे १,२ नव्हे तर तब्बल ४ धंदे सुरु आहे. आणि विशेष म्हणजे हे संपूर्ण अवैध दारूचे धंदे त्यांच्या घरुन लोकवस्तीत सुरु आहे. हे समाजासाठी खुप मोठा चित्तेंचा विषय बनला असून हीच परिस्थिती परिसरातील सर्व गावांमध्ये असून या दारुच्या अड्यावर हातभट्टी दारूच नव्हे तर देशी -विदेशी दारु सुद्धा मिळत असते. यामुळे या भागात दारुच्या अवैध धंद्यामुळे व्यसनाधिन झालेल्या व्यक्तीच्या संसारात तसेच समाजात वादाचे प्रकार घडत असतात. गावाची शांतता भंग होऊन गावांचे वातावरण हे दुषित होत आहे. दारुच्या आहारी गेलेल्या व्यक्तीच्या परिवारावर उपासमारीची वेळ तसेच त्यांच्या मुलांना शिक्षणा पासुन वंचित राहावे लागत आहे. वडिलांनी मेहनत मजदूरी करून कमावलेला पैसा हा दारुच्या अड्यावर उधळला जात आहे.

या दारुच्या अड्यामुळे शेजारी राहत असलेल्यांना तसेच शिक्षण घेत असलेल्या लहान मुलांना त्रास होत आहे. दारुच्या अड्यामुळे गावात कुठल्या- ना- कुठल्या कारणा वरून दारुड्यांचा धिंगाणा घालने चालूच असते. यामुळे गावातील नागरिक सुद्धा त्रस्त झाले असून भर दिवसा दारूची अवैध वाहतूक होत असल्याने संबंधित उत्पादन शुल्क विभागा सह पोलीस विभागाचे अवैध दारू विक्रीत हितसंबंध असल्याचे नागरिकांमध्ये बोलले जाते. यामुळे  मुद्दामहून तर दुर्लक्ष तर केले जात नाही ना? या प्रकाराला आशीर्वाद कोणा-कोणाचे? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!