रावेर – यावल तालुक्यात देशी – विदेशी दुकानांवर जादा दराने दारू विक्री
सावदा. ता. रावेर.मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l रावेर – यावल तालुक्यात देशी – विदेशी दारू जादा दराने विक्री केली जात असल्याच्या तक्रारी ग्राहकांकडून करण्यात आल्या आहेत.
रावेर तालुक्यातील रावेर परिसरासह रावेर, रावेर स्टेशन, सावदा, निंभोरा, खिर्डी, मस्कावद, चिनावल, वाघोदा, विवरा, गाते, थोरगव्हाण, दसनुर, निंबोल, ऐनपुर, पाल,सह तालुक्यात तसेच यावल परिसरासह तालुक्यातील फैजपूर, यावल , हींगोणा, न्हावी, बामनोद, पाडलसा, भालोद ,सह अनेक गावात देशी विदेशी ,बियरबार दुकानात ठरलेल्या किमती पेक्षा जास्त दराने दारू विक्री केली जात आहे. या बाबत दारू खरेदी करणाऱ्या ग्राहकाने सांगितले की, साडे सातशे रूपयांचा दारूचा खंबा सातशे पांचायेशी रुपयांना विकला जातो. अशीच जास्त किमतीने दारूच्या बाटल्या विकल्या जात आहेत असे सांगितले.