जे.ई.स्कूल,मुक्ताईनगर चा विद्यार्थी समर्थ वंजारी बाल वैज्ञानिक पुरस्काराने सन्मानित
मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी | जे.ई.स्कूल, मुक्ताईनगर चा विद्यार्थी समर्थ शिवाजीराव वंजारी यास होमीभाभा फाउंडेशन मुंबई यांच्याकडून बाल वैज्ञानिक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच भारतीय अंतराळ संस्था(ISRO) भेट देण्यासाठी समर्थ वंजारी दि.22 ला प्रस्थान करणार आहे .
सन 2024- 25 या शैक्षणिक वर्षात होमीभाभा फाउंडेशन मुंबई तसेच भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO )यांच्या संयुक्त विद्यमानाने इयत्ता पाचवी ते दहावी साठी परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.सदर परीक्षेला राज्यातून 1 लाख 70 हजार विद्यार्थी परीक्षेसाठी बसलेले होते. त्यातून जे.ई.स्कूल, मुक्ताईनगर या शाळेतील इयत्ता सातवी मधील समर्थ शिवाजीराव वंजारी या विद्यार्थ्याने महाराष्ट्र राज्यातून तृतीय क्रमांक प्राप्त केला.जे.ई.स्कूल चे शिक्षक शिवाजीराव भागवत वंजारीसर यांचा मुलगा असून होमीभाभा फाउंडेशन मुंबई यांच्या माध्यमातून बाल वैज्ञानिक पुरस्कार पद्मभूषण प्रा.पी.बी.जोशीसर यांच्याहस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.
सदर कार्यक्रमास शास्त्रज्ञ, होमीभाभा संशोधन केंद्राचे सर्व मान्यवर उपस्थित होते.तसेच समर्थला (ISRO) भेटीत उपग्रह संशोधन, उड्डाण संदर्भात शास्त्रज्ञ भेट,अवकाश संशोधन सर्व माहीती उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ISRO भेटीसाठी महाराष्ट्रातून गुणवंत वीस विदयार्थी व सुनिल कुलकर्णीसर समन्वयक होमीभाभा मुंबई व त्यांची सर्व टीम यांच्या मार्गदर्शना खाली महाराष्ट्रातून निवड करण्यात आलेल्या वीस विद्यार्थ्यांस सह जे.ई. स्कूलच्या मुक्ताईनगरच्या समर्थला संधी मिळाली.
या यशाबद्दल संधी माननीय आमदार एकनाथराव खडसे साहेब,मा.केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे तसेच मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटी चेअरमन रोहिणीताई खडसे- खेवलकर ,व्हा. चेअरमन नारायणदादा चौधरी सचिव डॉ. सी.एस.चौधरी ,सर्व सन्माननीय संचालक मंडळ, प्राचार्य एन पी भोंबे, उपप्राचार्य व्ही के शिर्के, पर्यवेक्षक व्ही.डि.ब-हाटे,एस.पी.राठोड सर्व व विज्ञान शिक्षक सर्व शिक्षक वृंद यांच्याकडून कौतुक करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासला जावा संशोधन वृत्ती जोपासली जावी यासाठी होमी बाबा फाउंडेशन मुंबई तसेच भारतीय अंतराळ संस्था इस्रो यांच्या माध्यमातून कार्य सुरू आहे.