भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यरावेर

संसर्ग वाढतोय; सावद्यात पाच अहवाल कोरोना बाधित  !

सावदा (प्रतिनिधी)।  शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पुन्हा वाढीस लागल्याचे दिसून येत आहे. आज आता आलेल्या कोरोना तपासणी अहवालात शहरातील पुन्हा ४ अहवाल व रात्री उशिरा आलेला १ रावेर रुग्णालयातील कार्यरत कर्मचारी असे एकूण ५ तपासणी अहवाल  बाधित आढळून आल्याने निष्पन्न झाले आहे. 

शहरातील आज आलेल्या ४ अहवाल व रात्री उशिरा आलेला १ अहवाल बाधित आढळून आले आहे,  त्यात ३ महिला व यामध्ये २  पुरुष असून दोन महिला व एक पुरुष मोठा आड एरिया स्वामीनारायण मंदिर परिसरातील तर एक महिला क्रांती चौक परिसरातील तसेच रात्री उशिरा आलेला बाधित व्यक्ती रावेर रुग्णालयात कार्यरत कर्मचारी दुर्गामाता मंदिर परिसरातील रहिवासी आहेत. सदरील काही परिसर आधीच सील आहेत तर काही  परिसर प्रशासनाकडून सील करण्यात येत आहे.   सदरील वृत्तास नगरपालिका प्रशासनाने दुजोरा दिला आहे.

सावदा शहरात कोरोना बाधित रुग्ण संख्या ८५ झाली असुन त्यात १० मयत तर उपचार २२ घेत आहेत व बाकी सर्व कोरोनाला हरवत घरी परतले आहे.

मंडे टू मंडे तर्फे आवाहन –

कोरोनाचा लढा देण्यासाठी नागरिकांनी स्वतःच्या, परिवाराच्या व परिसराच्या सुरक्षेसाठी आपल्याला जगुन कोरोना विरोधात लढा द्यायचा आहे म्हणुन घाबरून न जाता सर्व नागरिकांनी शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनाचे पालन करावे ही आता स्वतः ची जबाबदारी आहे तसेच फिजिकल डिस्टन्स चे पालन, मास्क वापरणे, सॅनिटाझरचा वापर करणे व अत्यावश्यक कामा शिवाय घरा बाहेर निघु नये अशा शासनाने दिलेल्या सर्व आदेशांचे पालन करावे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!