संदीप देशपांडेंनी पोलिसांच्या हातावर दिल्या तुरी, ताब्यात घेतांना दिला चकवा !
मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : राज्यात मशिदींच्या भोंग्यावरून वातावरण तापलं आहे. मनसेचे नेते राज ठाकरे Raj Thackeray यांनी सरकारला दिलेला अल्टिमेटम संपल्यानंतर मनसेने आक्रमक होत राज्यात ठिकठिकाणी भोंग्याविरोधात लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसा Hanuman Chalisa लावली जात आहे पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेत असतांना संदीप देशपांडे Sandeep Deshpande शिवतीर्थवर येताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता देशपांडेनी पोलिसांना चकवा देत गाडीत बसून निघून गेले आहे.
मनसेचे नेते राज ठाकरे यांनी सरकारला दिलेला अल्टिमेटम काल संपला. यानंतर मनसेने पदाधिकाऱ्यांना पोलीस ताब्यात घेत असतांना अनेक पदाधिकारी सध्या ‘आऊट ऑफ रिच’ आहेत. संदीप देशपांडेही पोलिसांना सापडत नव्हते. त्यांना याआधीच मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली होती. मात्र शिवतीर्थवर येताच देशपांडेनी पोलिसांना चकवा दिला.
अखेर राज ठाकरे यांच्या निवासस्थानी देशपांडे दाखल झाले. त्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. यानंतर बाहेर येत देशपांडे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यानंतर तत्काळ पोलिसांनी त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र देशपांडेंनी माध्यमांशी बोलताना चालत जाण्याचा बहाणा केला. याच क्षणी देशपांडे यांचा ड्रायव्हर गाडी घेऊन पोहोचला. पोलीस पाठीमागे पळत असतानाचा देशपांडे यांनी गाडीत बसून थेट पळ काढला. शिवतीर्थ समोरच त्यांनी पोलिसांच्या हातावर तुरी दिली.