भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यरावेरसामाजिक

महामार्गावर अपघातात जखमी महिलेसाठी संदिप सावळे यांनी दाखवली तत्परता

मुंजलवाडी, ता. रावेर. प्रतिनिधी, चंद्रकांत वैदकर l अपघातग्रस्त महीलेला उपचारार्थ रूग्णालयात केले दाखल बुरहानपूर-अंकलेश्वर महामार्गावर मोटरसायकल आणि कारच्या अपघातात एक महिला जखमी झाली. महामार्गावर पडलेल्या या जखमी महिलेला भाजपाचे युवामोर्चा जिल्हासरचिटणीस संदीप सावळे यांनी तत्काळ मदत केली आणि तिला रावेर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

या घटनेविषयी अधिक माहिती अशी की, महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच आहे. कालच एका अपघातात चार युवकांचा बळी गेला असताना, आजही बुरहानपूर-अंकलेश्वर महामार्गावर जंगली पिर नजीक रावेरकडून आहीरवाडीला जाणाऱ्या लताबाई राजू पाटील यांच्या मोटरसायकलला मागून एका कारने धडक दिली. या धडकेत लताबाई पाटील मोटरसायकलवरून खाली पडल्या. याच वेळी रावेरकडे येत असलेले भाजपाचे युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस संदीप सावळे, रावेर. यांनी ती महिला पाहून तत्काळ मदतीचा हात दिला. त्यांनी आपल्या खाजगी गाडीतून त्या महिलेला उचलून रावेर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

लताबाई पाटील यांच्या परिवाराने संदीप सावळे यांचे देवदूताप्रमाणे मदतीसाठी आभार मानले आहेत.
महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढत असून, अशा घटनांमध्ये मदतीसाठी तत्पर असलेल्या व्यक्तींचे कार्य कौतुकास्पद आहे. संदीप सावळे यांची तत्परता आणि माणुसकीचा आदर्श इतरांसाठी प्रेरणादायी आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!