मुक्ताईनगरसामाजिक

जळगाव आणि बुलढाणा जिल्ह्या साठी संजीवनी ; बाेदवड उपसा सिंचन याेजनेच्या रखडलेल्या प्रकल्पाच्या कामास गती

मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज, अक्षय काठोके l जळगाव आणि बुलडाणा जिल्ह्यातील ५३,४४९ हेक्टर क्षेत्रासाठी संजीवनी ठरणाऱ्या बाेदवड परिसर उपसा सिंचन याेजनेच्या यामुळे बऱ्याच वर्षांपासून रखडलेल्या सिंचन प्रकल्पाच्या कामास गती मिळणार असून यामुळे बोदवड तालुक्यातील सुमारे ११५०० हेक्टर शेत जमीन सिंचनाखाली येणार असून अवर्षण ग्रस्त असलेल्या बोदवड तालुक्याला संजीवनी ठरणाऱ्या या प्रकल्पा कडे बोदवड वासियांचे लक्ष लागलेले असून आ.चंद्रकांत पाटील यांचा या प्रकल्पासाठी पोट तिडकिने पाठपुरावा सुरू असून नुकत्याच पार पडलेल्या नूतन सरकारच्या पहिल्याच हिवाळी अधिवेशन डिसेंबर२०२४ मध्ये सदरील सिंचन योजनेवर पुरवणी अर्थसंकल्पातून २०० कोटी रुपये निधीची तरतूद करून घेतली होती. यासंदर्भात आज दि.18 फेब्रुवारी 2025 रोजी मुंबई येथे मंत्रालयात महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री ना.गिरीश महाजन यांचे दालनात बैठक पार पडली यावेळी आ.चंद्रकांत पाटील यांनी टप्पा क्र 2 चे कामास तत्काळ सुरुवात करावी जेणेकरून बोदवड तालुका वासीयांची प्रतीक्षा संपेल यासाठी चर्चा केली.

या प्रकल्पात जळगाव जिल्ह्यातील ३३,६६८ हेक्टर आणि बुलडाणा जिल्ह्यातील १९,७८१ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ हाेणार आहे. सन २०११ मध्ये तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन झाले हाेते. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित होऊन रखडलेल्या या प्रकल्पासाठी मागील पंचवार्षिक मध्ये आ.चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्याने मागील काळात सदरील बोदवड परिसर उपसा सिंचन योजनेच्या वितरण प्रणालीसाठी एक ६०० कोटी व दुसरी ६२५ कोटी अशा एकूण १२२५ कोटी रुपयांच्या निविदा प्रक्रिया झालेल्या होत्या यातून येथे काम सुरू झालेले असून नुकत्याच नूतन सरकारच्या पहिल्याच हिवाळी अधिवेशन डिसेंबर२०२४ मध्ये सदरील सिंचन योजनेवर पुरवणी अर्थसंकल्पातून २०० कोटी रुपयाची तरतूद झाली असून आता योजनेच्या रखडलेल्या कामाला आणखी गती मिळणार आहे.

कसे आहे योजनेचे स्वरूप ?
बोदवड परिसर उपसा सिंचन योजनेचे काम दाेन टप्प्यांमध्ये नियाेजित आहे. त्यात पहिल्या टप्प्यातील पंपगृह अ, पंपगृह ब, जुनोने साठवण तलावाचे ३०१.०० मी. तलावापर्यंतचे काम उद्धरण नलिकेची एक रांग ही कामे पूर्ण करून १४,९९४ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण केली जाणार आहे.

टप्पा क्र.१ व टप्पा क्र.२

प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात १४,९९४ हेक्टर दुसऱ्या टप्प्यात ३८,४५५ हेक्टर जमिनीवर सिंचनाचा लाभ मिळणार आहे. यात जिल्ह्यातील बोदवड, जामनेर आणि मुक्ताईनगर तालुक्याला लाभ होणार आहे.

अशी असेल याेजना
मुक्ताईनगरजवळ तापीचे बॅकवाॅटर असलेल्या पूर्णा नदीच्या काठी खामखेडा येथे इंटेक चॅनल जॅकवेल बांधले जात असून सदरील जॅकवेलमधून पाणी उपसा करून जॅकवेलपासून २५०० मिमीच्या दाेन पाईपलाईनद्वारे पहिल्या टप्प्यात जुनाेने येथे साठवण तलावात पाणी साेडले जाईल.

दुसऱ्या टप्प्यात १८५० मिमी व्यासाच्या पाईपलाईनद्वारे जामठी येथे साठवण बंधाऱ्यात पाणी साेडले जाईल. दाेन्ही ठिकाणी मातीचे साठवण बंधारे बांधणे प्रस्तावित आहे. साठवण बंधाऱ्यांमधून जळगाव जिल्ह्यातील ६३ टक्के, तर बुलडाणा जिल्ह्यातील ३७ टक्के क्षेत्र सिंचनाखाली येईल. बंधाऱ्यांमधून बंद पाईपलाईनद्वारे शेतापर्यंत पाणी वितरित होणार आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!