भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

मुक्ताईनगरसामाजिक

मुंबईमध्ये संत मुक्ताई सेवक ह.भ.प. रवींद्र हरणे महाराज होणार पुरस्काराने सन्मानित !

मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी l महानगरी मुंबईमध्ये श्री.वारकरी प्रबोधन महासमिती महाराष्ट्र आणि सर्व विश्वस्त व पालखी सोहळा समिती यांच्या वतीने श्री पांडुरंगाचा भव्य पालखी सोहळा व संत संमेलन असा रोप्य महोत्सवी कीर्तन महोत्सव सोहळा रविवार दिनांक 5 जानेवारी 2025 रोजी कॉटन ग्रीन श्रीराम मंदिर, मुंबई येथे पार पडणार असून या सोहळ्यात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हरिभक्त परायण रवींद्र हरणे महाराज (संत मुक्ताई पालखी सोहळा प्रमुख श्रीक्षेत्र मुक्ताईनगर जि. जळगाव) यांना 2025 चा मानाचा पुरस्कार “दै.सामना समाज प्रबोधन पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

तसेच त्यांच्यासह वारकरी रत्न पुरस्कार ह.भ.प.बन्सी महाराज बीड (संत हैबतीबाबा वारकरी सेवा पुरस्कार), ह.भ.प माणिक महाराज मुखेकर (आळंदी) यांना (वारकरी सेवा धर्म पुरस्कार), ह.भ.प.दीपक महाराज शिंदे (दैनिक सामना वृत्तपत्र नॅशनल हेड पुरस्कार) तसेच मुंबई विशेष पुरस्कार अंबादास महाराज जगताप (कल्याण किर्तनकार), मंगेश महाराज चक्कर (मुंबई किर्तनकार), बंडाराज महाराज घाडगे (पोलादपूर मृदंगाचार्य ताल महर्षी) आदींना या रोप्य महोत्सवी सोहळ्यात पुरस्काराने सन्मानित केले जाणार

दरम्यान संत मुक्ताई सेवक व संत मुक्ताई पालखी सोहळा प्रमुख रवींद्र हरणे महाराज यांना मानाचा पुरस्कार जाहीर झाल्याने संत मुक्ताई संस्थानचे अध्यक्ष ॲड रवींद्र भैय्यासाहेब पाटील, संस्थानचे विश्वस्त व फडकरी टाळकरी किर्तनकार तसेच परिसरातील मान्यवरांकडून हरणे महाराज यांचे अभिनंदन केले जात आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!