भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

मुक्ताईनगरसामाजिक

संतभुमी मुक्ताईनगर हरिनाम गजराने दुमदुमणार : भाविकांचे हस्ते ध्वजपूजन पडले पार !

मुक्ताईनगर, मंडे टू मंडे प्रतिनिधी : उभारीला ध्वज तिही लोकावरी /ऐसी चराचरी किर्ती ज्यांची // अशी ख्याती असलेल्या आदिशक्ती मुक्ताबाई यांच्या माघवारी महाशिवरात्री यात्रोत्सवास भाविक वारकर्याच्या हस्ते ध्वजपूजन करून सुरूवात झाली.माघ अमावस्या पर्यंत टाळ मृदंगाचे गजरात परिसर न्हावून निघणार आहे.

शेकडो वर्षांची परंपरा लाभलेली गुरू शिष्य चांगदेव मुक्ताबाई माघवारी महाशिवरात्री यात्रा आजपासून दिंड्यापालख्या आगमनाने अवघी मुक्ताईनगरी दुमदुमून जाणार आहे.
शुक्रवारी सकाळी 11वा. हभप.रविंद्र महाराज हरणे, संस्थान विश्वस्त माणिकराव पाटील, शंकरराव संबारे, व्यवस्थापक उध्दव महाराज जुनारे, पंकज महाराज पाटील, वारकरी सेवा संस्थेचे पुरूषोत्तम वंजारी, पुजारी विनायकराव व्यवहारे,बारसु खडसे, लक्ष्मण महाराज वाघोदे, दिलीप महाराज साठे, अंबादास महाराज अढाव, त्र्यंबक महाराज व भाविक भक्त उपस्थित होते.
मुक्ताईनगर पंचक्रोशीत दाखल झालेल्या दिंड्या आज उशिरापर्यंत आप आपल्या फडावर दाखल होतील.तेथे तीन दिवस भजन किर्तन कार्यक्रमाद्वारे भक्तीरसाचा आनंद घेतील. समाजपयोगी वस्तूंची दुकाने थाटली असून ग्राहकांना पर्वणीच ठरणार आहे. दोन वर्षांच्या खंडानंतरची वारी असल्याने भाविकांची प्रचंड गर्दी होईल असे जाणकारांचा अंदाज आहे

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!