प्रेमीयुगलाची सप्तश्रृंगी गडावरून ४०० फुट खोल दरीत उडी घेत आत्महत्या
नाशिक, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l सप्तश्रृंगी गडावरून ४०० फुट खोल दरीत उडी मारून प्रेमीयुगलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रियांका संतोष तिडके. वय १६ वर्ष. आणि मंगेश राजाराम शिंदे.वय २४ वर्ष .या तरूण- तरूणीचे नाव असून ते गेल्या सात दिवसांपासून बेपत्ता होते.
गडाच्या पायथ्याला कुजलेला मृतदेह गुराख्यांनी पाहिला असता त्यांनी पोलिस पाटील विजय चव्हाण यांना माहिती दिली. त्यानंतर पोलिस पाटलाने पोलिस स्टेशनला खबर दिल्यावर घटनास्थळी पोलिस दाखल झाले. मृतदेहाजवळ आढळलेल्या साहित्यावरून त्यांची ओळख पटवण्यात आली आहे. ते दोघं गेल्या आठवड्याभरापासून बेपत्ता होते. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास सुरू आहे.