ब्रेकिंग : सरपंच व शिपयासह खाजगी ईसम एसीबी च्या जाळ्यात, १० लाखांची केली लाचेची मागणी
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l जळगाव जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचे सरपंचा सह शिपाई व एक खाजगी ईसम याना पहिला हप्ता म्हणून २ लाखांची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
यातील तक्रारदार हे ७० वर्षीय पुरुष असून त्यांची मौजे बहाळ रथाचे ता.चाळीसगाव, जि जळगाव येथे गट क्रमांक ५७/२ क्षेत्र १ हेक्टर ६४ आर अशी शेत जमीन असून सदर शेतजमिनीवर ग्रामपंचायत बहाळ हे त्यांचा हक्क दाखवून सदरची जागा परस्पर इतर व्यक्तीस भाडेतत्त्वावर देण्याची शक्यता असल्याने तक्रारदार यांनी ग्रामपंचायती विरुद्ध मा. न्यायालयातून कायमस्वरूपी मनाई हुकूम आणला होता.
त्यानंतर सरपंच राजेंद्र महादू मोरे यांनी तक्रारदार यांना भेटून त्यांच्या शेतजमिनी बाबत ग्रामपंचायत कडून कोर्टकचेऱ्यांचा त्रास न होऊ देण्याच्या मोबदल्यात दीड हजार चौरस फुटाचा प्लॉट खरेदी करून द्यावा लागेल असे सांगितले त्या तक्रारदार यांनी नकार दिल्याने सरपंच मोरे यांनी १० लाख रुपयांची लाचेची मागणी केल्याची ला प्र.वि धुळे कार्यालयाकडे तक्रारदार यांनी तक्रार दिली होती.तक्रारदार यांच्या तक्रारीची दि. २९/११/२०२४ रोजी पंचांग समक्ष पडताळणी केली असता सरपंच राजेंद्र मोरे व शिपाई शांताराम बोरसे यांनी तक्रारदार यांच्याकडे दीड हजार चौरस फुटाचा प्लॉट खरेदी करून देण्याच्या स्वरूपात लाचेची मागणी केली असता, त्यास तक्रारदार यांनी नकार दिल्याने सरपंच राजेंद्र मोरे व शिपाई शांताराम बोरसे यांनी १० लाख रुपयांची लाचेची मागणी करून तडजोडी अंती ५ लाख रुपये स्वीकारल्याचे मान्य केले होते.
त्याप्रमाणे आज दि.२६.१२.२४ रोजी तक्रारदार यांचे बहाळ येथील राहत्या घरी सापळा लावला असता सरपंच राजेंद्र मोरे व शिपाई शांताराम बोरसे यांनी सांगितल्याप्रमाणे लाचेच्या रकमेपैकी पहिला हप्ता २ लाख रुपये स्वीकारताना खाजगी ईसम यांना रंगेहात पकडण्यात आले. त्या नुसार , १) राजेंद्र महादू मोरे, वय – ५७. रा. बहाळ , ता. चाळीसगाव , पद -सरपंच ग्रामपंचायत बहाळ रथाचे, ता चाळीसगाव, जि. जळगाव. २) शांताराम तुकाराम बोरसे, वय 50 वर्ष,रा. बहाळ रथाचे पद- (ग्रामपंचायत शिपाई )ता.चाळीसगाव, जि.जळगाव ३) सुरेश सोनू ठेंगे, वय 40 वर्ष, व्यवसाय – शेती, रा.बहाळ ता.चाळीसगाव, जळगाव (खाजगी इसम) यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई परिवेक्षण अधिकारी- सचिन साळुंखे
पोलीस उपअधिक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे.सापळा अधिकारी पंकज शिंदे, पोलीस निरीक्षक
लाचलुचपात प्रतिबंधक विभाग धुळे. पो.हवा. राजन कदम,पो. हवा. पावरा, सुधीर मोरे, पो.शि. रामदास बारेला, प्रवीण पाटील सर्व नेमणूक ला.प्र.वि. धुळे यांनी केली.