क्राईमजळगावपाचोरा

ब्रेकिंग : सरपंच १० हजारांची लाच घेताना जळगाव एसीबी च्या जाळ्यात

जळगाव जिल्ह्यातील घटना

जळगाव, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l गाव नमुना आठ अ मध्ये ग्रामसेवकाकडून नाव लाऊन देण्यासाठी दहा हजारांची लाच मागून ती स्वीकारताना जळगाव जिल्ह्यातील खडकदेवळा ता. पाचोरा येथील सरपंच अनिल विश्राम पाटील वय ४६ वर्ष. व खाजगी पंटर बलराम हेमराज भील वय ४७ वर्ष. राहणार – खडकदेवळा बु. ता. पाचोरा या दोघांना जळगाव एसीबी ने अटक केली. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.ही घटना आज शुक्रवार दिनांक  २७ रोजी संध्याकाळी घडली.

तक्रारदार हे पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा बुदृक येथील रहिवाशी असून त्यांना प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत घरकुल मंजूर झाले आहे. परंतु तक्रारदार रहात असलेली जागा ही त्यांच्या नावावर नसल्याने गाव नमुना आठ अ मध्ये नावे लावण्याचे काम ग्रामसेवक यांच्या कडून करून देतो परंतु त्या साठी तुम्हाला मला दहा हजार रुपये द्यावे लागतील. अशी मागणी दिनांक २७ सप्टेंबर शुक्रवार रोजी सरपंच अनिल पाटील यांनी केली. या बाबत तक्रारदाराने जळगाव लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.या बाबत पडतळणीही करण्यात आली. आज शुक्रवारी संध्याकाळी सरपंच अनिल पाटील यांनी लाचेची रक्कम १० हजार रुपये खाजगी पंटर बलराम भील यांचे कडे देण्याचे संगीतल्यानंतर सरपंच अनिल विश्राम पाटील वय ४६ वर्ष. व बलराम हेमराज भील वय ४७ वर्ष या दोघांना अटक करण्यात आली व त्यांच्यावर पाचोरा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई जळगाव लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक योगेश ठाकूर,पोलिस निरीक्षक स्मिता नवघरे,पोलिस निरीक्षक नेत्रा जाधव, राकेश दुसाने, दिनेशसिंग पाटील, किशोर महाजन, रविंद्र घुगे,सुनील वानखेडे,शैला धनगर, प्रणेश ठाकूर,बाळू मराठे,अमोल सूर्यवंशी या पथकाने केली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!