भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमरावेर

अतिक्रमण करणं भोवले : सरपंच, उपसारपंचासह पाच जण अपात्र !

तासखेडा, ता. रावेर, मंडे टू मंडे न्युज, अनिल इंगळे । रावेर तालुक्यातील रायपूर येथील सरपंच, उपसरपंच आणि तीन ग्रामपंचायत सदस्य अशा एकूण पाच जणांना ग्रामपंचायत जागेवर अतिक्रमण करणे चांगलेच भोवले असून याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडून त्यांना अपात्र घोषीत करण्यात आले असून यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

तालुक्यातील रायपूर येथील मनोहर लक्ष्मण पाटील यांनी रायपूर येथील सरपंच रूपेश युवराज पाटील, उपसरपंच तुकाराम सखाराम तायडे, ग्रामपंचायत सदस्य सौ. रेखाबाई ज्ञानेश्वर तायडे, सौ. माधुरी योगेश चौधरी आणि प्रकाश भिकारी तायडे यांनी ग्रामपंचायत हद्दीत अतिक्रमण केल्याची तक्रार केली होती यासाठी त्यांना ग्रामसेवकांनी मदत केल्याचा आरोप देखील तक्रारीत करण्यात आला होता.

या प्रकरणाची सुनावणी जिल्हाधिकार्‍यांकडे पार पडली महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ च्या कलम १४ (१) (ज-३) अन्वये सदरील सरपंच उपसरपंच व इतर तीन अशा पाचही जणांना अपात्र ठरविण्यात येत असल्याचा निर्णय जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिला आहे. हा निर्णय १९ जुलै रोजी पारीत करण्यात आलेला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!