आधी अश्लिल चॅट…. नंतर तरुणांना….. महिलेचा काळा धंधा….
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
सातारा,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। महिला तरुणांना प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करायची. त्यांच्यासोबत अश्लील चॅट करण्याचा प्रयत्न करायची. तसेच त्यांना अश्लील चॅट करण्यासाठी प्रवृत्त करायची. त्यानंतर मुलांना बदनामीची धमकी देवून खंडणी गोळा करायची. विशेष म्हणजे महिलेचा पतीही तिच्यासोबत या कृत्यात सहभागी असायचा.
महिलेने आतापर्यंत वेगवेगळ्या गावातील अनेक तरुणांना अशाप्रकारे फसविल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत आरोपींविरोधात कारवाई केली आहे. पोलिसांनी महिला आणि तिच्या पतीविरोधात हनीट्रॅपचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच पोलिसांनी आरोपींना सुगावा लागण्याआधीच बेड्या ठोकल्या आहेत.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, साताऱ्यातील वाई तालूक्यातीलच ओझर्डे येथील पुनम मोरे आणि हेमंत मोरे हे दोघे पती-पत्नी तरुणांना हेरत होते. पुनम ही युवकांसोबत आश्लिल चॅट करायची. नंतर मुलांनाही आश्लिल चॅटिंग करण्यास भाग पाडायची. तिचा हा सर्व प्रकार पतीलासोबत घेऊन सुरु होता. नंतर याच चॅटिंगचा आधार घेऊन तरुणांना धमकी देवून खंडणी गोळा केली जात होती. हा चाललेला सर्व प्रकार एका युवकाच्या सतर्कतेमुळे उघड झाला. जितेंद्र जाधव याने वाई पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांच्या तपासात या दोघांनी वाई तालूक्यातीलच कवठे, बोपेगाव आणि सटालेवाडी गावातील युवकांकडून खंडणी गोळा केल्याचे समोर आले आहे. या दोघांनी सातारा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतही अशाच प्रकारे युवकांकडून पैसे उकळल्याचे समोर येत आहे. साताऱ्यात वाई पोलीस ठाणे हद्दीत या महिलेच्या काळ्या धंद्याचा पर्दाफाश झाला आहे.