भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

आकाशातून उल्का पडल्यासारख्या तेज शलाका : नेमकं काय घडलंय ?

जळगाव, मंडे टू मंडे वृत्तसेवा :  राज्यात बराच ठिकाणी जळगाव जिल्ह्यात उल्कापिंड कोसळल्याची ही चर्चा आहे. उल्का पडल्यासारख्या तेज शलाकाचं दृश्य पाहायला मिळालं असून ते नेमकं उल्का पिंड आहे की सॅटॅलाइटचे तुकडे होऊन तो विखुरला याबाबत काही स्पष्टता नसली तरी खगोल अभ्यासकांनी हा पृथ्वीच्या कक्षेत आलेला उपग्रह असल्याची शंका वर्तवली आहे.

आकाशातून लाल झोत खाली कोसळत असल्याचे दिसले चित्र समोर आले आहे. आताच थोड्यावेळापूर्वी आकाशातून खूप मोठी वस्तू जळत खाली पडल्याचे व्हिडीओ आणि फोटो मी पाहिलेले आहेत. जुनं सॅटेलाईट (Satellite Ring) पृथ्वीच्या कक्षेत खेचलं जाऊन त्याचे तुकडे तुकडे होऊन जळत खाली आले असल्याची शक्यता आहे. फोटो आणि व्हिडीओवरुन असं वाटतंय. मोठी उल्का पृथ्वीकडे खेचत आली तर तसं होऊ शकतं. मात्र, दृश्यावरुन असं दिसतंय की ते जुन्या सॅटेलाईटचं भाग असावेत, असं खगोलाशास्त्रज्ञ अशे मत यावर व्यक्त केले आहे.

जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी उल्कापात दिसल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे दरम्यान अनेकांनी उल्कापात सारख्या तेज शालाखा होताना आपल्या मोबाईल च्या कॅमेऱ्यात उल्कापात कैद केले असून सोशल मीडियावर सुद्धा मोठ्या प्रमाणात शालाखांचे व्हिडिओ व्हायरल होत असल्याने अनेकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. मात्र नेमके या उल्का कुठे पडल्या या अद्याप समजू शकले नाही.

एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्र, औरंगाबादचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी, “न्यूझीलंड येथील माहीया द्वीपकल्पावरुन भारतीय वेळेनुसार सायंकाळी ६:११ वाजता तेथील रॉकेट लॅब कंपनीच्या इलेक्ट्रॉन रॉकेटद्वारे ब्लॅकस्काय नावाचा उपग्रह पृथ्वीच्या ४३० किमी उंचीवर नेऊन स्थिरावण्यात आला. आजच्या तारखेत केवळ एकाच रॉकेट उड्डाणाची नोंद असल्याने आज सायंकाळी उत्तर – पुर्व महाराष्ट्रात दिसलेली घटना ही या इलेक्ट्रॉन रॉकेटच्या बुस्टरचेच असावेत… आपल्या भागात साधारण तीस ते पस्तीस किमी उंचीवरून बुस्टर वातावरणाशी घर्षण झाल्याने एकामागोमाग एक असे ते जळत गेले. दिसणार्‍या घटनेचा मार्ग व प्रकाशमान याचा अंदाज घेतला तर ही कोणतीही उल्का वर्षाव किंवा उडती तबकडी सारखी घटना नाही ही निश्चीत” असं मत व्यक्त केलं.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!