भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

नाशिकराजकीय

नाशिक विधानपरिषद निवडणुकीत मोठा ट्वीस्ट; मुलासाठी बापाची माघार !

नाशिक, मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मोठा ट्वीस्ट आला आहे. सुधीर तांबे यांना काँग्रेसने उमेदवारी दिली होती, तसंच सुधीर तांबे यांच्या नावाने एबी फॉर्मही आला होता, पण सुधीर तांबे यांनी फॉर्मच भरला नाही. यांच्याऐवजी सत्यजीत तांबे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे.

काँग्रेसमधून सुधीर तांबे यांना एबी फॉर्म देण्यात आला होता. मात्र, उमेदवारी अर्ज प्रक्रियेत ऐनवेळी सुधीर तांबे यांनी माघार घेत मुलगा सत्यजित तांबे यांना उमेदवारी दिली आहे. मात्र सत्यजित तांबे यांनी आता अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला आहे. वेळेमध्ये एबी फॉर्म आला नाही, म्हणून मी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याचं सत्यजीत तांबे म्हणाले. अपक्ष उमेदवार असलो तरी मी काँग्रेसचाच आहे, असंही सत्यजीत तांबे यांनी स्पष्ट केलं.

विधानपरिषद निवडणुकीचा अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता, पण शेवटच्या क्षणापर्यंत तांबे पिता-पुत्रांपैकी कोण अर्ज भरणार याचा सस्पेन्स कायम होता. सुधीर तांबे आणि सत्यजीत तांबे हे दोघंही उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आले होते, पण नेमका उमदेवार कोण? याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती.

दुसरीकडे भाजपकडूनही शेवटपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल होत नव्हता, त्यामुळे सत्यजीत तांबे भाजपच्या वाटेवर आहेत, अशी चर्चा सुरू झाली होती. अपक्ष उमेदवार असलो तरी आपण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन पाठिंबा मागणार असल्याचं सूचक विधान सत्यजीत तांबे यांनी केलं आहे. या नाट्यमय घडामोडीत ते बिनविरोध निवडणून येण्याचीही शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!