भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

मुक्ताईनगरराजकीय

सावदा नगरपरिषदेच्या १८. ०६ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेस मान्यता, आ. चंद्रकांत पाटलांचा पाठपुरावा !

मुंबई/मुक्ताईनगर, मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधि : अमृत अभियाना अंतर्गत मुक्ताईनगर शहराची पाणीपुरवठा योजने नंतर आता मतदार संघाचे आ. चंद्रकांत पाटील यांच्या पाठपुरव्याने सावादा येथील १८.०६ कोटीच्या पाणीपुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. मुक्ताईनगर पाणीपुरवठा योजनेचा शासन निर्णय आ चंद्रकांत पाटील यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव पालक मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थित देण्यात आला.

अमृत 2.0 अभियान सावदा नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा (18.06 कोटी रुपये अंदाजपत्रकीय रक्कम) या प्रकल्पास प्रशासकीय मान्यता मिळाली असून यासंदर्भात महाराष्ट्र शासन, नगर विकास विभागाने शासन निर्णय क्रमांक अमृत -2023/प्र. क्र.98/नवि -33 मुंबई दि.13.03.2023 अन्वये परिपत्रक जाहीर झालेले असून यासाठी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश आलेले आहे. त्यांनी मुक्ताईनगर सावदा बोदवड या मतदारसंघातील तीनही नगरपालिका क्षेत्रात पाणीपुरवठा योजना व्हावी यासाठी जनतेला अशावस्त केले होते.

राज्याचे मुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला आहे तसेच मागील काळात या संदर्भात मंत्रालयात आढावा बैठक देखील पार पडलेले होती. त्यामुळे या सर्व प्रयत्नांना यश आलेले असून गेल्या आठवड्यात दिनांक 3 मार्च 2023 रोजी मुक्ताईनगर ची पाणीपुरवठा योजना मंजूर झालेली असून आज दिनांक 13 मार्च 2023 रोजी सावदा येथील पाणीपुरवठा योजना मंजूर झालेली आहे. तसेच येत्या पंधरा दिवसात बोदवड पाणीपुरवठा योजना ही मंजूर होणार आहे अशी माहिती आमदार चंद्रकांत पाटील यांचे स्वीय सहाय्यक प्रवीण चौधरी यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!