नशीराबाद पोलीस स्टेशन कडील महिला अत्याचाराच्या गुन्ह्यात दिड महिन्यापासुन फरार आरोपीस सावदा पोलीसांनी केले जेरबंद
सावदा, ता. रावेर. मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l नशीराबाद पोलीस स्टेशन कडील महिला अत्याचाराच्या गुन्ह्यात गेल्या दिड महिन्यापासुन फरार असलेल्या आरोपीस सावदा पोलीसांनी शोधून अटक करून त्याला नशिराबाद पोलिस स्टेशनच्या ताब्यात दिले.
नशीराबाद पोलीस स्टेशन गुरंनं. 112/2024 भारतीय न्याय संहीता कलम 173 ( 2) वाढीव कलम 96 सह पोक्सो कायदा कलम 12 प्रमाणे दाखल गुन्हयातील आरोपी मोहीत दिलीप कोळी रा.भादली बु.ता.जि.जळगांव हा मागील दिड महिन्यापासुन नशीराबाद पोलीसांना मिळत नव्हता. नशीराबाद पोलीस स्टेशनचे सहा.पोलीस निरीक्षक श्री मनोरे यांनी सावदा पोलीस स्टेशनचे सहा.पोलीस निरीक्षक श्री.विशाल पाटील यांना माहीती देवुन सदरचा आरोपी हा सावदा पोलीस स्टेशनचे हद्दीत असले बाबत माहिती देऊन कळविले.
सावदा पोलिस स्टेशनचे सपोनि विशाल पाटील यांनी सावदा पोलीस स्टेशनचे पोहेकाँ. विजय पोहेकर, पोहेकाँ. सिकंदर तडवी, पोकाँ. सुनिल कुरकुरे, पोकाँ. बबन तडवी, पोकाँ. विनोद दामोदर यांचे पथक तयार करून त्यांना वर नमूद आरोपीचा शोध घेणे कामी रवाना केले.
सपोनि विशाल पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सदर पोलीस पथकाने मोहित कोळी या आरोपी बाबत गोपनीय माहिती काढून त्यास गाते. ता.रावेर येथे त्याचे नातेवाईकाच्या घरातून ताब्यात घेवून पोलीस स्टेशनला आणले त्याचे कडे चौकशी केली असता त्याचा गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न झाल्याने आरोपी मोहित कोळी यास पुढील कारवाई कामी नशीराबाद पोलीस स्टेशन चे पोलीस उप निरीक्षक गणेश देशमुख व पथक यांचे ताब्यात दिले.