भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेर

दिवाळी सुटटीमध्ये बाहेरगावी जातांना रोख रक्कम तसेच मौल्यवान वस्तु घरात ठेवु नका सावदा पोलीस स्टेशनचे आवाहन

सावदा, ता.रावेर. मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l समस्त सावदा पोलीस ठाणे हददीमध्ये राहत असलेल्या जनतेस सावदा पोलीस स्टेशनच्या वतीने आवाहन करण्यात येते की, दिवाळी निमीत्त शाळेना तसेच सरकारी कार्यालयांना सुटटी लागलेली असल्याने बरेच कुटुंब हे दिवाळी सण साजरा करण्यासाठी त्यांचे मुळ गांवी किंवा नातेवाईक यांचेकडे जात असतात त्यावेळी त्यांचेकडील मुल्यवान वस्तु, रोख रक्कम, सोन्या चांदीचे दागीने हे बंद घरामध्ये न ठेवता त्या बँकेच्या लॉकरमध्ये ठेवाव्यात किंवा सोबत घेवुन जाव्यात. आपल्या मौल्यवाण वस्तुंच्या सुरक्षीततेसाठी घर बंद करुन बाहेरगांवी जात असल्यास त्याबाबत शेजारी तसेच पोलीसांना कळविणे आवश्यक आहे.

गल्लीतील बरेचसे कुटुंब हे सुटटीवर जात असल्यास त्यांनी काही दिवसांकरीता गल्लीमध्ये राञगस्तीसाठी गुरखा नेमावा तसेच त्याबाबत पोलीस स्टेशनला कळवुन तेथे राञगस्त करण्याची मागणी करावी. बंद घराच्या परीसरातीत लाईट सुरु राहील याची व्यवस्था करावी, आपल्या गल्लीमध्ये किंवा घराचा परीसर दिसेल अशा ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे लावण्याचा प्रयत्न करावा तसेच आपले शेजारी पाजारी यांचे सतत संपर्कात राहावे.


आपला शेजारी हा खरा पहारेकरी या म्हणीप्रमाणे आपले शेजारी यांना आपण बाहेरगांवी जात असल्यास विश्वासात घेवुन कळविणे आवश्यक आहे. आपल्या आयुष्याची कमाई ही बंद घरामध्ये ठेवुन पश्चातापाची वेळ आणु नका ती सुरक्षीतरीत्या बँकेच्या लॉकरमध्ये ठेवण्याबाबत प्रयत्न करावा. राञी अपराञी कुठलाही संशयीत व्यक्ती गल्लीमध्ये फिरतांना मिळुन आल्यास पोलीस स्टेशनशी संपर्क करावा किंवा डायल ११२ यावर कॉल करुन पोलीसांना अवगत करावे. संशयीत व्यक्ती मिळुन आल्यास किंवा त्यास पकडुन ठेवल्यास परीसरातील नागरीकांनी त्यास मारहाण करु नये. असे आवाहन विशाल पाटील, सहायक पोलीस निरीक्षक सावदा पोलीस स्टेशन यांनी कळविले आहे मे

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!